Electoral Bonds : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर केलीय. याबाबतची माहिती सार्वजनिक केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या यादीत सर्वात जास्त राजकीय पक्षांना देणगी कोणी दिली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर राजकीय पक्षांना देणगी देण्यात सर्वात आघाडीवर लॉटरी किंग सँटियागो मार्टिन (Lottery king santiago martin) हे आहेत. त्यांनी 1368 कोटी रुपयांचा निधी राजकीय देणगीच्या स्वरुपात दिला होता. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती. 


निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या माहितीनुसार, सँटियागो मार्टिन यांनी राजकीय पक्षांना मोठी देणगी दिली आहे. सँटियागो मार्टिन हे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स नावाच्या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी देणगी देण्यात सर्वात आघाडीवर आहे. विविध राजकीय पक्षांना या कंपनीनं देणगी दिली आहे. ही कंपनी लॉटरी व्यवसायत काम करते. 


देशातील 13 राज्यामध्ये या कंपनीचा व्यवसाय 


सँटियागो मार्टिन यांची फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स नावाची कंपनी देशातील अनेक राज्यांमध्ये काम करते. ज्या राज्यात कायदेशीररित्या लॉटरीला परवानगी मिळाली आहे. दक्षिण भारतातील काही भागात आणि ईशान्य भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणाल लॉटरीचा व्यवसाय पसरला आहे. देशातील 13 राज्यामध्ये या कंपनीचा व्यवसाय चालतो. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, केरळ, मध्य प्रदेश, मध्य प्रदेश, मणिपूर, महाराष्ट्र, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, आणि पश्चिम बंगालमध्ये कंपनीचा व्यवसाय चालतो. त्यांच्या कंपनीत 1000 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. सँटियागो मार्टिन यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून लॉटरीचा व्यवसाय सुरु केला होता. इतक्या लहान वयापासून त्यांनी लॉटरी खरेदी आणि विक्रेत्यांचं मोठं जाळं तयार केलं होतं. यातून त्यांना मोठा फायदा झाला. 


सँटियागो मार्टिन नेमके कोण? 


दरम्यान, मिळालेल्या सँटियागो मार्टिन हे मोठे व्यवसायिक आहेत. लॉटरीचा व्यवसाय सोडून ते बांधकाम व्यवसायत देखील कार्यरत आहेत. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही त्यांच काम आहे. मेडिकल कॉलेजसह, हॉस्पिटल, मुझ्यिक चॅनल अशा विविध क्षेत्रात त्यांचे काम सुरु आहे. दरम्यान, मार्टिन यांचा काही काळ वादग्रस्त गेला. त्यांना विविध प्रकारच्या गुन्ह्यात अटक देखील करण्यात आली होती. त्यांच्यावर 4,500 कोटी रुपयांच्या फसणुकीचा आरोप करण्यात आला होता. तसेच त्यांच्या घरावर पोलिसांनी छापे देखील टाकले होते. त्यांची काही संपत्ती देखील जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.   


महत्वाच्या बातम्या:


Electoral Bonds: निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँड्सचा तपशील जाहीर, कोणत्या कंपनीने राजकीय पक्षांना किती निधी दिला?