Agriculture News : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी (Farmers) सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत टप्प्या टप्प्यानं चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता याप्रमाणे दिली जाते. आत्तापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमी झाले आहेत. लवकरत 19 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होमार आहे. 


सरकारनं 2019 मध्ये PM किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. ज्या अंतर्गत सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात दोन हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात पाठवले जाते. या योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. लवकरच 19 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात जारी करण्यात येणार आहे.


फेब्रुवारीमध्ये पीएम किसान हप्ता मिळण्याची शक्यता


PM किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. या योजनेंतर्गत सुमारे 13 कोटी शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. शासकीय योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी दिला जातो. गेल्या वेळी म्हणजेच पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात रिलीज झाला होता, जो फेब्रुवारीमध्ये 4 महिने पूर्ण करेल. त्यामुळे पीएम किसानचा पुढचा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पीएम किसानसाठी कसा कराल अर्ज? 


1. PM किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम PM किसानच्या वेबसाइटवर जावे लागेल.


2. त्यानंतर तेथे New Farmer Registration वर क्लिक करा.


3. यानंतर तुम्हाला तेथे आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँक माहिती प्रविष्ट करावी लागेल.


4. फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.


'या' लोकांना योजनेचा लाभ मिळणार नाही


ज्या लोकांना भारत सरकारकडून किसान सन्मान निधी मिळत नाही. त्यांना स्पष्टपणे समजावून सांगितले आहे की कोणती पावले पाळायची आहेत. यासाठी सर्वप्रथम सरकारने ई-केवायसी करण्याची माहिती जारी केली होती. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे ई-केवायसी केलेले नाही. त्यांना याचा लाभ मिळणार नाही. 19 वा हप्ता त्याच्या खात्यात येणार नाही.


महत्वाच्या बातम्या:


शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचा 19 व्या हफ्ता मिळवण्यासाठी 'या' 2 गोष्टींची पूर्तता करा