Soybean Purchase Center : सध्या सोयाबीन (Soybean) शेतकरी उत्पादक संकटात सापडला आहे. एका बाजुला सोयाबीनला मिळणारा कमी दर तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या हमीभाव केंद्रावरील सोयाबीनची खरेदी (Soybean Purchase Center) बंद आहे. धाराशिव जिल्ह्यात 21 हमीभाव खरेदी केंद्र आहेत. यामधील 13 हमीभाव केंद्रावरील सोयाबीनची खरेदी बारदान्या (पोती) अभावी बंद आहे. सध्या शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारत आहेत. मात्र, सोयाबीन खरेदजीसाठी नंबर येत नसल्याचं दिसत आहे.
32 हजार पैकी फक्त 5 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी
सोयाबीन खरेदी केंद्राकडे धाराशिव जिल्हाभरात 32 हजार शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त 5 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी 6 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आल असली तरी जेखील अनेक शेतकऱ्यांची नोंदणी रखडली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी सरकारने खरेदी केंद्र सुरू केले. मात्र सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही खरेदी केंद्र ठप्प झाली आहेत.
13 हमीभाव खरेदी केंद्रावरील सोयाबीन खरेदीला ब्रेक
बारदाना (पोते) नसल्याने धाराशिव जिल्ह्यात 21 पैकी 13 हमीभाव खरेदी केंद्रावरील सोयाबीन खरेदीला ब्रेक लागलाय. इतर ठिकाणीही किरकोळ स्वरूपात खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात 32 हजार शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त 5000 शेतकऱ्याकडून सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे खरेदी केंद्राकडे नोंदणी केलेले शेतकरी आपला नंबर कधी येणार हे पाहण्यासाठी चकरा मारत आहेत.
सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 6 जानेवारीपर्यंत वाढवली
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 6 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. आता सोयाबीनच्या खरेदीसाठी 6 जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे, अशी महिती देखील पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख 34 हजार 331 मेट्रिक टन एव्हढी विक्रमी खरेदी झाली आहे. मागील वर्षी केवळ 7 हजार 400 क्विंटल एवढी खरेदी झाली होती. यावर्षी शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. राज्यात सध्या 561 खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत 6 लाख 69 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या: