Agriculture Fund : कृषी स्टार्टअपला (Agriculture startup) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं (Govt) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं 750 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Agriculture Minister Shivraj Singh Chauhan) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कृषी स्टार्टअप्सना आर्थिक मदत देण्यासाठी 'कृषी' फंड सुरु करण्यात आला आहे.
केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी 750 कोटी रुपयांचा 'AgriSure' निधी स्थापन केला आहे. जो Agritech स्टार्टअप्सना आर्थिक मदत करेल. सरकारने 14,000 कोटी रुपयांच्या सात कृषी योजनांना मंजुरी दिली आहे. याबाबत खासगी आणि सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले आहे. कृषी निवेश आणि 'ऍग्रीशुअर' फंड या एकात्मिक कृषी गुंतवणूक पोर्टलच्या शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंत्री बोलत होते. 750 कोटी रुपयांचा 'AgriSure' फंड स्टार्टअप्स आणि 'कृषी-उद्योजकांना' इक्विटी आणि कर्ज भांडवल प्रदान करेल.
शिवराज सिंह चौहान यांनी स्टार्टअप्सना या निधीचा वापर करण्यास सांगितले आहे. ॲग्रीटेक स्टार्टअपसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. शेतीमध्ये केवळ सरकारीच नव्हे तर खासगी गुंतवणुकीची गरज आहे. या क्षेत्रात उत्पादन आणि मूल्यवर्धन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोगांची गरज असल्याचे चैहान म्हणाले.
लहान शेतकऱ्यांचे गट तयार करण्यावर भर
मोठ्या प्रमाणावर शेती करण्यासाठी लहान शेतकऱ्यांचे गट तयार करण्यावर भर देण्यात आल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. तसेच रासायनिक कीटकनाशके आणि खतांच्या अतिवापराबद्दलही त्यांनी वक्तव्य केलं. मातीचे आरोग्य जपण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. चौहान यांनी कृषी गुंतवणूक पोर्टलचे महत्त्वही अधोरेखित केले, जे गुंतवणूकीच्या संधी आणि माहितीचे केंद्रीकरण करून कृषी परिदृश्य बदलेल अशी अपेक्षा आहे.
'या' बँकांना पुरस्कार
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांना पुरस्कार मिळाले. एचडीएफसी बँकेला खासगी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार मिळाला. बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँक, पंजाब ग्रामीण बँक, बडोदा यूपी ग्रामीण बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि सर्व हरियाणा ग्रामीण बँक यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाले. मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा यांना कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाले.
महत्वाच्या बातम्या: