दिल्ली: माजी आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. कालच(बुधवारी) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर केला असून पूजा खेडकरचं (Pooja Khedkar) अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2022 आणि 2023 च्या परीक्षेत सादर केलेली प्रमाणपत्र खोट्या कागदपत्रांद्वारे तयार केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केला आहे. तर UPSC ने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत पूजा खेडकरने ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसं रिजॉइंडर देखील तिने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलं आहे.
त्याचबरोबर पूजा खेडकरने (Pooja Khedkar) मी 12 वेळा युपीएससी परीक्षा दिली असली तरी केवळ मी दिव्यांग कॅटगरीत दिलेली परीक्षा गृहीत धराव्यात असं देखील पूजा खेडकरने म्हटलं आहे.एकूण 12 वेळा परिक्षा दिली आहे. त्यापैकी पाच वेळा दिव्यांग कॅटगरीतून परीक्षा दिली त्यामुळे बाकीच्या ७ वेळा दिलेल्या परीक्षा गृहीत धरू नयेत असं तिने म्हटलं आहे.तर दुसरीकडे हे एकटीच काम नसून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे तपासण्यासाठी पूजाला (Pooja Khedkar) अटक करण्यात यावी अशी मागणी UPSC कडून करण्यात आली आहे. आज कोर्ट पूजाचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावणार की तिचा जामीन मंजूर करून तिला दिलासा देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
पूजा खेडकरच्या 2 अपंगत्व प्रमाणपत्रांपैकी एक बनावट असल्याचा संशय
दरम्यान दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला आहे, त्यामध्ये पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) 2 अपंगत्व प्रमाणपत्रांपैकी एक बनावट असल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी यूपीएससीने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली आहे. पूजा खेडकरने (Pooja Khedkar) नागरी सेवा परीक्षा- 2022 आणि 2023 दरम्यान दोन अपंगत्व प्रमाणपत्रे (एकाधिक अपंगत्व) सादर केली होती. ही दोन्ही प्रमाणपत्रे नगरच्या वैद्यकीय प्राधिकरणाने जारी केली आहेत, असे पूजा खेडकरने सांगितले होते. एका प्रमाणपत्राबाबत नगर वैद्यकीय प्राधिकरणाने, ते आम्ही जारी केलेले नाही, असं स्पष्टीकरण दिलेलं आहे.
तर दुसरीकडे, यूपीएससी परीक्षेत आरक्षणासाठी उमेदवाराचे 40 टक्के अपंगत्व असणे आवश्क आहे. मी 47 टक्के अपंग आहे, असा दावा पूजा खेडकरने (Pooja Khedkar) न्यायालयात सादर केलेल्या अर्जातून केलेला आहे.