एक्स्प्लोर

Gautam Adani : अदानींच्या अडचणीत भर! क्रेडिट सुईसनंतर आता अमेरिकेतून आली चिंता वाढवणारी बातमी

Adani Group News :  गौतम अदानी यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. स्विर्त्झलंडमधील क्रेडिट सुईस या संस्थेनेने केलेल्या कार्यवाहीनंतर आता अदानी यांना अमेरिकेतून धक्का बसला आहे.

Adani Group News :  मागील दिवसांपासून भारतीय उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अडचणीत भर पडत आहे. अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण झाली आहे. मागील पाच दिवसात अदानी समूहाच्या बाजार भांडवलात 39 टक्क्यांची घसरण झाली आहे. स्विर्त्झलंडमधील क्रेडिट सुईस या संस्थेनंतर आता अदानी यांना अमेरिकेतून धक्का बसला आहे. 

अदानींची कोंडी 

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. क्रेडिट सुईस या खासगी बँकिंग कंपनीने अदानी समूहाला धक्का दिला आहे. अदानी समूहाच्या बाँड आणि सिक्युरिटीची व्हॅल्यू झिरो केली आहे. क्रेडिट सुईसने केलेल्या कारवाईनंतर अदानी समूहाच्या शेअर दरात 25 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. 

अमेरिकेतून वाईट बातमी

क्रेडिट सुईसनंतर अमेरिकेतील सिटी ग्रुपनेदेखील अदानी समूहातील कंपनीची लँडिंग व्हॅल्यू हटवली आहे. सिटी ग्रुपच्या वेल्थ युनिटने अदानी समूहाच्या बाँडवर कर्ज देण्यास बंदी घातली आहे. अमेरिकेत झालेल्या या कारवाईनंतर आता  अदानी समूहाच्या शेअर दरात आणखी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

रिझर्व्ह बँकेने मागवली माहिती 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील बँकांना अदानी समूहातील त्यांच्या एक्सपोजरबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तनुसार, सेबीनेही या प्रकरणी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. अदानी ग्रुपमधील जवळपास सर्व शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 38.2 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या पाच दिवसांत अदानी शेअर्स 38.7 टक्क्यांनी घसरले आहेत.

100 अब्ज डॉलरचे नुकसान 

अदानी (Adani Group)  समूहाला  आठवड्याभरात शंभर अब्ज डॉलरचं  नुकसान झाल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. शंभर अब्ज डॉलर ($100 billion) भारतीय मूल्य 8.23 लाख कोटी आहे. अदानी समूहाच्या भांडवली बाजार मूल्यात (cumulative market capitalization loss) ही घसरण झाली आहे. अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी हिंडनबर्ग रिसर्च बिनबुडाचा असल्याचा दावा केला आणि अदानी समुहातील सर्व कंपन्याची बॅलन्सशीट मजबूत असल्याचा दावा केला तरी विक्रीचा सपाटा थांबला नाही.

एफपीओ मागे घेण्याची नामुष्की

अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता. हा एफपीओ बुधवारी मागे घेण्यात आला. याबाबत अदानी समूहानं परीपत्रक जारी केले आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget