Adani Buys Stake in Cleartrip : देशातील अनेक विमानतळांचे व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर आता अदानी उद्योग समूह ऑनलाईन ट्रव्हल क्षेत्रात उतरला आहे. गौतम अदानी यांनी online travel aggregator (OTA) कंपनी Cleartrip Private Limited मध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे. या डीलबद्दल अधिकची माहिती अद्याप समोर आली नाही. पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हिस्सेदारी खरेदीची ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. क्रिअरट्रिप ही कंपनी फ्लिपकार्टच्या मालकीची आहे.
कोरोना काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर विमानाच्या मार्गे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. क्रिअरट्रिप या कंपनीचे अधिग्रहण फ्लिपकार्टने या आधीच केलं आहे. फ्लिपकार्टने ही कंपनी ताब्यात घेतल्यानंतर या कंपनीच्या एअरलाईन्स आरक्षणामध्ये तब्बल दहा पटीने वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आता अदानी समूहाने या कंपनीच्या काही प्रमाणातील हिस्स्यांची खरेदी केल्यानंतर या कंपनीच्या व्यापारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्रिअरट्रिप हा भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रव्हल ब्रॅन्ड आहे.
या व्यवहारासंबंधी अदानी समूहाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, फ्लिपकार्टसोबत आमचं संबंध अधिक व्यापक होऊन ते आता डेटा केंद्र, पूर्ती केंद्र आणि हवाई प्रवास यासोबत अनेक क्षेत्रात वाढत आहे. एका स्वदेशी कंपनीसोबत भागिदारी केल्यानंतर त्याचा फायदा देशातील युवकांना होणार असून त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नामध्ये हे एक छोटसं योगदान आहे.
यूजर फ्रेन्डली आणि तंत्रज्ञानाचा सोपस्कर वापर यामुळे क्लिअरट्रिप हे अल्पावधीत प्रसिद्ध पावलं आहे. या माध्यमातून विमानांचे आरक्षण अगदी सुलभ पद्धतीने होत असल्याने याच्या वापराला प्राधान्य दिलं जातं. क्लिअरट्रिपची मालकी आता फ्लिपकार्टकडे असून त्यामध्ये अदानी समूहाने अल्पसा हिस्सा खरेदी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अदानी समूह देशातील विविध उद्योग क्षेत्रांमध्ये उतरत असल्याचं दिसून येतं.
महत्वाच्या बातम्या :
- Forbes List : कोरोना काळात अब्जाधीशांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ, मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत
- Gautam Adani : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा अटकेत, मग गौतम अदानी का ट्रेन्ड होतायंत?
- Hurun India : सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत, अदानींच्या संपत्तीत रोज 1002 कोटींची भर