Adani Green Energy Update : अदानी समूहाने (Adani Group) त्यांच्या अक्षय ऊर्जा कंपनी अदानी ग्रीन एनर्जीमध्ये (Adani Green Energy Ltd AGEL) 9350 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. कंपनीच्या बोर्ड बैठकीत संचालक मंडळाने प्रवर्तकांना 1480.75 रुपयांच्या शेअर किंमतीवर 9350 कोटी रुपयांचे प्रिफरेन्शिअल वॉरंट जारी करण्यास मान्यता दिली आहे. या रकमेतून कंपनी कर्जाचा बोजा कमी करेल आणि भांडवली खर्चावर खर्च करेल.


स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या फाइलिंगमध्ये कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. कंपनीने सांगितले की, बोर्डाने अदानी ग्रीन एनर्जीच्या प्रवर्तकांना 1480.75 रुपये प्रति शेअर या दराने 9350 कोटी रुपयांचे प्रिफरेन्शिअल वॉरंट जारी करण्यास मान्यता दिली आहे. या निधीतून कर्जाची परतफेड करण्याबरोबरच कंपनी 2030 पर्यंत 45 गिगावॉट क्षमतेत वाढ करण्यासाठी खर्च करणार आहे. 


 




दोन लाख एकर जमिनीवर प्रकल्प


कंपनीने सांगितले की, अदानी ग्रीन एनर्जी 2030 पर्यंत 45 GW चे लक्ष्य निश्चितपणे साध्य करेल. 40 GW अतिरिक्त क्षमतेसाठी 2 लाख एकर जमीन सुरक्षित खरेदी करण्यात आली आहे.  40 GW क्षमतेचे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी 9350 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली जाईल.


अक्षय उर्जेमध्ये भारत नेतृत्व करेल


अदानी ग्रीन एनर्जी बोर्डाच्या या निर्णयावर अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, भारत अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक लिडर बनण्याच्या मार्गावर आहे आणि अदानी ग्रीन एनर्जी या क्रांतीचे नेतृत्व करत आहे. अदानी कुटुंबाचा गुंतवणुकीचा हा निर्णय देशातील स्वच्छ इंधनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधिलकी दर्शवितो. या माध्यमातून आपण पारंपरिक उर्जा स्त्रोतांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढू शकतो आणि आपल्या जलद वाढ आणि विकास योजनांना चालना देण्यासाठी हरित आणि परवडणारे पर्याय देखील स्वीकारू शकतो. या गुंतवणुकीद्वारे अदानी ग्रीन एनर्जी निश्चितपणे त्यांचे वाढीचे लक्ष्य गाठण्यात यशस्वी होईल.


प्रवर्तकांच्या गुंतवणुकीच्या बातम्यांदरम्यान अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर मंगळवारच्या व्यवहारात 4.38 टक्क्यांच्या वाढीसह 1600 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 70 टक्क्यांनी वाढला आहे.


ही बातमी वाचा: