Adani Enterprises calls off its FPO : अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत अदानी समूहानं परीपत्रक जारी केले आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचं अदानी समूहानं परिपत्रकात सांगितलं आहे.  


अदानी समुहाच्या शेअर्समध्ये आज तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर अदानी इंटरप्राईजेसने 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ रद्द केला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या एफपीओमध्ये पैसे गुंतवले होते त्यांना ते परत केले जातील, असे परिपत्रकात म्हटलेय.


अदानी समुहानं नुकताच अदानी एंटरप्राइजेज (Adani Enterprises) याचा FPO जारी केला होता. 31 जानेवारीपर्यंत गुंतवणूकधारकांना पैसे गुंतवण्याची संधी दिली होती. पण कंपनीनं एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली, कंपनीमधील सदस्यांच्या हितासाठी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला.  अदानी समूहाकडून गुंतवणूकधारकांना पैसे परत दिले जाणार आहेत. 


सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत अदानी समूहानं एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे.  पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचं कंपनीनं आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर कंपनीच्या समभागाची रक्कम ऑफर प्राईजच्याही खाली गेल्याचं बघायला मिळालं होतं. बजेटच्या दिवशीच म्हणजे आज अदानी एन्टरप्राझेजचा शेअर 28 टक्क्यांनी गडगडला होता. गुंतवणूकदारांच्या हितार्थ हा निर्णय घेत असल्याचं अदानींचं म्हणणं आहे. 


20 हजार कोटींचा एफपीओ अदानी समुहानं बाजारात आणला होता.  27 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान हा एफपीओ खुला होता. पण एक फेब्रुवारी रोजी बजेटच्याच दिवशी शेअरमार्केटमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पडझड झाली. आज अदानी एंटरप्राझेजचा शेअर 28 टक्क्यांनी गडगडला होता. त्यामुळे अदानी समूहानं एफपीओ माघारी घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुंतवणूकदारांचा एक ना एक रुपया परत करु, असे अदानी समुहानं परिपत्रक काढत सांगितलं आहे. 


हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अमेरिकी शॉर्ट सेलर आणि हिंडनबर्ग रिसर्च यांच्या अहावालानंतर कंपनीच्या समभागाची रक्कम ऑफर प्राईजच्याही खाली गेल्याचं बघायला मिळालं होतं. त्यानंतर कंपनीनं एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अदानी समूहाने शेअर दरात वाढ करण्यासाठी फेरफार आणि इतर प्रकार केले असल्याचा आरोप हिंडनबर्गच्या अहवालात केला होता. अदानी समूहाने मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड केल्याचा दावा केला होता.










एफपीओ म्हणजे काय? 


आयपीओ बाजारात आणल्यानंतर कंपनीला पुन्हा भांडवलीची गरज भासते. अशावेळी कंपनी पुन्हा आपले शेअर्स बाजारात विक्रीला काढते. आणि याला एफपीओ म्हणजे  फॉलो ऑन पब्लिक ऑफर असं म्हणतात. काही वेळा नव्याने शेअर्स जारी देखील केले जातात. एफपीओ नव्या आणि जुन्या गुंतवणूकदारांसाठी असतात. 


हिंडेनबर्गचा रिपोर्ट काय होता? 
 
अदानी समूह आपल्या शेअर्सचे भाव स्वत: वाढवतो असा आरोप आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत मागील ३ वर्षात अनेक पटीनं वाढ झाली आहे. अदानी समूहाच्या 7 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्सचे भाव सरासरी 819 टक्क्यांनी वाढलेत.  येत्या काळात अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव 85 टक्के पडू शकतात. अदानी समूहातील कंपन्यांवर कर्ज अधिक आहे आणि अधिक शेअर्स गहाण ठेवली गेली आहेत .  


आणखी वाचा :
Hindenburg From Adani Group : हिंडनबर्गचा अहवाल म्हणजे भारतावर हल्ला; आरोपांनंतर अदानींकडून तब्बल 413 पानांचं उत्तर