Lok Sabha Election Survey : 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. भाजपसह विरोधी पक्षानेही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 2019 मध्ये पराभूत झालेल्या लोकसभा मतदार संघात भाजपनं कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. काँग्रेस पार्टीनेही आपली तयारी सुरु केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा केली आहे. त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला कितपत होईल, ते निवडणुकीच्या निकालानंतरच समजले. काँग्रेसशिवाय इतर पक्षानेही लोकसभा निवडणुकीची तयारीही सुरु केली आहे. त्याशिवाय काही विरोधी पक्ष तिसरी आघाडी तयार करण्याच्या तयारीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष कोण ता असेल... याची चर्चा सध्या सुरु आहे. नुकताच झालेला सर्वेनं भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. भाजपसाठी हे आकडे डोकेदुखी वाढवणारे आहेत.
इंडिया टुडे आणि सी वोटर यांच्या सर्वेनुसार, मोदी ब्रँडची जादू पुन्हा एकदा 2024 मध्ये चालताना दिसेल. पण काही राज्यात भाजपला मोठं नुकसान होऊ शकतं. 'मूड ऑफ द नेशन' या नावानं इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी सर्वे केला आहे. या सर्वेमध्ये काही राज्यात भाजपला मोठं नुकसान होऊ शकतं असे समोर आले आहे. भाजपला सर्वात जास्त नुकसान कर्नाटकमध्ये होण्याचा अंदाज या सर्वेतून समोर आला आहे. या राज्यात भाजपनं 2019 मध्ये 28 पैकी 25 जागांवर बाजी मारली होती. पण लोकसभा 2024 मध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यात आहे.
काय आहे सर्वे ?
इंडिया टुडे आणि सी वोटर यांच्या सर्वेनुसार, 2024 लोकसभा निवडणुकीत कर्नाटमध्ये एनडीएला मोठं नुकसान होऊ शकते.. तर यूपीएला मोठा फायदा होत असल्याचं समोर आलेय. कर्नाटकमध्ये यूपीएला 43 टक्के फायदा होईल. 2019 मध्ये कर्नाटकमध्ये यूपीएला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या घडीला निवडणुका झाल्या तर यूपीएला कर्नाटकमध्ये 17 जागा मिळू शकतात, असे सर्वेतून समोर आलेय. म्हणजेच, 25 मधून 17 जागा काढल्या तर एनडीएला फक्त 8 जागा मिळतील.
भारत जोडो यात्रा झाल्यानंतर आला सर्वे
कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 20 दिवसांपर्यंत होती. सर्वेनुसार, भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला मोठा फायदा झाल्याचं दिसत आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये राजकीय रणनीती खेळली होती. कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रा होती, तेव्हा सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हजेरी लावली होती. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये सात जिल्ह्यातील सात लोकसभा मतदार संघातून गेली. चामराजनगर, मैसुरू, मांड्या, तुमकुर, चित्रदुर्ग, बेल्लारी आणि रायचूर या ठिकाणाहून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गेली होती. या भारत जोडो यात्रेचा कर्नाटकमध्ये काँग्रेसला फायदा झाल्याचं सर्वेतून समोर आले आहे. कर्नाटकमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो, असं सर्वेतून समोर आले आहे.