Hindenburg Research on Adani Group : अदानी ग्रुपकडून (Adani Group) एक निवेदन जारी करण्यात आलंय. हिंडनबर्गच्या (Hindenburg)  आरोपांवर 413 पानांचे उत्तर अदानी ग्रुपने दिलंय. यात अदानी ग्रुपने हिंडनबर्गचे आरोप म्हणजे, भारतावरील हल्ला असल्याचं म्हटलंय. एवढेच नाही, तर 24 जानेवारीला 'मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन' हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तावेज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट हेतूने केलेले संयोजन आहे. यात एका विशिष्ट उद्देशाने ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आल्याचं अदानी ग्रुपने म्हटलं आहे.  


दरम्यान, हिंडनबर्गच्या आरोपांवर अदानी ग्रुपने 413 पानांचं उत्तर दिलं आहे. हिंडनबर्गचे आरोप म्हणजे भारतावरील हल्ला आहे. बदनाम करण्यासाठी हिंडनबर्गचे आरोप निराधार आहे. मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन' हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत, हा अहवाल खोटा आहे.  हिंडनबर्गचे दस्ताऐवज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट केलेले संयोजन आहे. हा आमच्या विरोधात रचलेला एक कट आहे. अहवालात केलेल्या या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यास आम्ही बांधिल नाही. परंतु,  हिंडनबर्गने केलेले आरोप खोडून काढण्यासाठी आम्ही या प्रश्नांना उत्तर देत आहोत. 


हिंडनबर्गने प्रकाशित केलेला अहवाल केवळ स्वार्थी हेतूने जाहीर केला आहे. हिंडेनबर्गने शेअरच्या किंमतीमध्ये फेरफार करण्यासाठी आणि त्यांचे मूल्य कमी करण्यासाठी शिवाय बाजारात अफवा पसरविण्यासाठी हा दस्तऐवज प्रकाशित केला आहे. वस्तुस्थिती म्हणून केले गेलेले आरोप वणव्यासारखे पसरले. परिणामी यांचा हिंडनबर्गला मात्र मोठा लाभ झाला आहे. हिंडनबर्गने केलेल्या आरोपांमुळे आमच्या शेअर होल्डर्सचे मोठे नुकसाान होण्याची शक्यता आहे, असे झाल्यास आम्ही त्यासंदर्भात न्यायालयात दाद मागू असेही अदानी ग्रुपने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.


अदानी  देशाची पद्धतशीर लूट करत आहे, हिंडनबर्गचं  प्रत्युत्तर 


अदानींच्या 413 पानांच्या रिपोर्ट मधली केवळ 30 पानं आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांशी निगडित आहेत. त्यातही 88 पैकी 62 प्रश्नांची उत्तर देण्यात अदानी अपयशी ठरले आहेत. देशाची पद्धतशीर लूट करत स्वतःला भारतीय राष्ट्रध्वजात लपेटून बचाव करू पाहत आहेत, असे हिंडेनबर्गनं अदानी ग्रुपला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे. 


 






Hindenburg Research च्या अहवालात काय म्हटलंय?


Hindenburg Research ने आपल्या अहवालात अदानी समूहातील कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येऊ शकतो, असे या अहवालात म्हटले. त्याशिवाय, अदानी समूहाने शेअर दरात वाढ करण्यासाठी फेरफार आणि इतर प्रकार केले असल्याचा आरोप केला आहे. अदानी समूहाने मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड केल्याचा दावा केला आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दर अधिक असून मूल्यांकनापेक्षा सुमारे 85 टक्के अधिक दर आहेत.