Success story of Sandal farming: अलिकडच्या काळात शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहे. पारंपारिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीनं पिकांची लागवड करत आहेत. अलीकडच्या काळात अनेक शेतकरी चंदन शेतीचा (Sandal farming) प्रयोग करताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका चंदनाची लागवड केलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा (Success story) पाहणार आहोत. अविनाश कुमार यादव (Avinash Kumar Yadhav) असं या शेतकऱ्याचं नाव असून ते उत्तर प्रदेशातील (UP) गोरखपूर येथील रहिवासी आहेत. या शेतकऱ्याने पांढऱ्या चंदनाची लागवड केलीय. या शेतीतून त्याला करोडो रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत आहे. विशेष म्हणजे अविनाश यांनी पोलिसाची नोकरी सोडून शेती सुरु केली आहे. 


आजच्या घडीला चंदनाच्या झाडांची उंची 13 ते 14 फूट


अविनाश कुमार यादव यांनी 2016 मध्ये कर्नाटकातून पांढऱ्या चंदनाची 50 रोपे आणली होती. त्यावेळी एका रोपाची किंमत 200 रुपये होती. अविनाश कुमार यांनीच परिसरात प्रथम पांढऱ्या चंदन लागवडीचा पाया घातला. त्यांच्या या शेतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. आजच्या घडीला चंदनाच्या झाडांची उंची ही 13 ते 14 फूट झाली आहे. आज हे एक चंदनाचे झाड 30 ते 35 हजार रुपयांना विकले जाऊ शकते. पण अविनाश कुमार यांनी अद्याप कोणत्याही झाडांची विक्री केली नाही. आणखी 10 वर्षांनी या झाडांच्या माध्यमातून अविनाश कुमार यांना करोडो रुपये मिळणार आहेत. सध्या या चंदनाला 1200 रुपये किलोचा दर आहे.  


ओसाड जमिनीवर कमी पाण्यात पांढरे चंदन येते


पांढऱ्या चंदनाची लागवड झाल्यानंतर सुरुवातीला एक वर्ष या झाडांची काळजी घेणं गरजेचं आहे. पण त्यानंतर विशेष काळजी घेण्याची गरज नसते. ओसाड जमिनीवर कमी पाण्यात पांढरे चंदन येते. या झाडाची उंची साधारणत 15 ते 20 फूट असते. हे झाड तयार होण्यासाठी 15 ते 20 वर्षे लागतात. 


औषधे, साबण, अगरबत्ती तयार करण्यासाठी चंदनाला मोठी मागणी


अविनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्आ पत्नीने त्यांना प्रथम पांढरे चंदन लावण्याची कल्पना दिली होती. कारण, सध्या पांढऱ्या चंदनाला बाजारात मोठी मागणी आहे. औषधे, साबण, अगरबत्ती, जपमाळ, फर्निचर, लाकडी खेळणी, हवन, अत्तर, विविध वस्त बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चंदनाचा वापर केला जातो. दरम्यान, अविनाश कुमार आंनी दिलेल्या माहितीनुसार एका एकरात चंदनाची 410 रोपे लावता येतात. दोन झाडांच्यामध्ये 10 फूट अतर असणं गरजेचं आहे. एका एकरात चंदनाची लागवड करण्यासाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च येतो. 


कोणत्याही हंगामात चंदनाची लागवड 


दरम्यान, चंदनाची लागवड करताना तम्ही कोणत्याही हंगामात करु शकता. विशेष हंगामातच लागवड करावी असे काही नाही. तसेच तुम्ही लावत असलेल्या झाडाचं वय दोन वर्ष असावं. झाड लावलेल्या ठिकाणी जास्त पाणी साचू देऊ नये. 


पोलिसाची नोकरी सोडून शेतीला सुरुवात


अविनाश कुमार हे 1998 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले होते. मात्र शेती करण्यासाठी अविनाश कुमार यांनी 2005 मध्ये पोलीस नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शेतकरी करत होते. 2016 मध्ये त्यांनी चंदनाच्या 50 रोपांची लागवड केली आहे. आता त्यांना फक्त काही वर्षांची प्रतीक्षा आहे. 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अविनाश कुमार यांना कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


नर्सरीनं बदललं महिलेचं जीवन, फळे आणि भाजीपाला पिकांच्या लागवडीतून मिळवतेय लाखो रुपये