Saving Money : देशातील लोकांची बचत (Saving) झपाट्यानं कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटानंतर (Corona Crisis) हे प्रमाण खुप वाढलं आहे. सरकारनं (Govt) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केवळ 3 वर्षांत कुटुंबांची निव्वळ बचत ही 9 लाख कोटी रुपयांनी कमी झालीय. कर्जाचा डोंगर देखील वाढल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढलीय.  


भारतीयांच्या डोक्यावर कर्जाचा भार देखील दुपटीनं वाढला


कोरोनाच्या संकटाचा देशातील सर्वच क्षेत्राला फटका बसला होता. या काळात मोठ्या प्रमाणात लोकांची बचत संपली होती. सरकारच्या आकडेवारीनुसार फक्त तीन वर्षात 9 लाख कोटी रुपयांची बचत संपली आहे. तर भारतीयांच्या डोक्यावर कर्जाचा भार देखील दुपटीनं वाढलाय. लोकांनी जरी शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढवली असली तरी कर्ज वाढत असल्याचं दिसत आहे. 


शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली


देशातील कुटुंबांची मागील तीन वर्षातील बचत 9 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 14.16 लाख कोटी रुपयांवर आली आहे. बततीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळतa आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कुटुंबांची आर्थिक बचत ही 17.12 लाख कोटी रुपयांवर घसरली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात ती आणखी कमी होऊन 14.16 लाख कोटी रुपये तर 2017-18 मध्ये निव्वळ देशांतर्गत बचतीची सर्वात कमी पातळी 13.05 लाख कोटी रुपये होती. सरकारी डेटामध्ये दिलेल्या माहितीनुसार, शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2022-23 मधील गुतंवणूक ही 1.79 लाख कोटी रुपये झाली आहे. 


दिवसेंदिवस बचतीचं महत्व वाढत आहे


दिवसेंदिवस बचतीचं महत्व वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं महत्वाचे आहे. रोज थोडी थोडी बचत करुन गुंतवणूक केली तर भविष्यात ती मोठी रक्कम जमा होते. त्यामुळं मोठी रक्कम एखाद्या मोठ्या कामासाठी फायद्याची ठरते. त्यामुळं आत्तापासूनचं गुंतवणूक करणं काळाची गरज आहे. दरम्यान, सध्या अनेक लोक शेअर्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक देखील नागरिकांसाठी फायद्याची ठरत आहे. कारण कमी काळात अधिक परतावा मिळवून देणाऱ्या विविध प्रक्राच्या स्कीम आहेत. त्यामुळं गुंतवणूक करताना नागरिकांनी चांगला परतावा आणि आपण ठेवत असलेली रक्कम सुरक्षीत आहे का? या दोन गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


PPF की FD ? गुंतवणूक नेमकी कशात करावी? जाणून घ्या फायदे आणि तोटे?