एक्स्प्लोर

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी खूशखबर, मोदी सरकारने 4 टक्के वाढवला DA

DA Hike : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डीए (महागाई भत्ता) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोदी सरकारने खूशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डीए (महागाई भत्ता) चार टक्केंनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता 38 टक्केंवरुन 42 टक्के केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णायामुळे कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. प्रत्येकवर्षी मार्चमध्ये केंद्र सरकार डीएमध्ये वाढ करते. 


केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चार टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या असलेला 38 टक्के महागाई भत्ता वाढून 42 टक्के इतका होईल.

केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू केला जाईल. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याच्या निर्णयानंतर सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 12,815.60 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या निर्णयाचा फायदा 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे निश्चित केलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे. 

किती वाढणार पैसे - 

महागाई भत्ता वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, त्याशिवाय पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. किती पैसे वाढणार ते उदाहरणासह पाहूयात.. समजा एखाद्या कर्मचारा बेसिक पगार 25500 रुपये आहे.. सध्याच्या 38 टक्केंच्या डीएनुसार त्याला 9690 रुपये मिळतात.. जर डीए 42 टक्के झाला तर महागाई भत्ता 10710 रुपये होईल.. म्हणजे प्रत्येक महिन्याला 1020 रुपये वाढीव वेतन मिळेल. 

चार वर्षात कसा वाढला डीए ?

31 डिसेंबर, 2019 पर्यंत 7th Pay Commission च्या आधारावर वेतन घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 17 टक्कें महागाई भत्ता मिळत होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष कोरोनामुळे महागाई भत्त्यामध्ये कोणतीही वाढ झाली नाही. जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता 11 टक्केंनी वाढवण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये यामध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली. याला एक जुलै 2021 पासून लागू करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना वेतन अथवा पेन्शनधारकांना पेन्शन डीए एक जुलै 2021 पासून 31 टक्केंच्या दराने मिळत होता. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. त्यानंतर गेल्यावर्षी यामध्ये चार टक्के वाढ करण्यात आल्यामुळे डीए 38 टक्के झाला होता. आता यामध्ये पुन्हा चार टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे  आता 42 टक्के दराने सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता देण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

दारुचे भाव दहा पटीने वाढवा, साखरेचे भाव निम्म्यावर आणा, माजी मंत्र्याची अजब मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र
दारुचे भाव दहा पटीने वाढवा, साखरेचे भाव निम्म्यावर आणा, माजी मंत्र्याची अजब मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget