Kantar Global Issues Barometer : कंटारच्या ग्लोबल इश्यूज बॅरोमीटरनुसार (Kantar Global Issues Barometer) 76 टक्के शहरी ग्राहकांना दररोजच्या वाढत्या खर्चामुळे त्यांच्या मोठ्या जीवन योजना पुढे ढकलणे किंवा सोडून देणे भाग पडले आहे. खाण्या पिण्याच्या किंमती वाढत असल्याने बचत ही त्यांच्यासाठी दुरापास्त झाली आहे.
 
अहवालानुसार, ग्राहक आता मोबाईल फोन, टिकाऊ वस्तू आणि कार यासारख्या महागड्या वस्तूंवर कमी खर्च करत आहेत. शिवाय, ते त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी किंवा त्यांच्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी भविष्यासाठी बचत करण्याऐवजी आज आणि आताच्या खर्चाला प्राधान्य देत आहेत. कंटारच्या अहवालानुसार, यामुळेच शहरी लोकांमध्ये जीवन योजना आणि राहणीमानाचा खर्च चिंतेचा विषय बनत आहे.


दैनंदिन खर्च भागवणे कठीण


अनेकांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण जात असल्याचे अहवालात म्हटले आहे. सुमारे 35 टक्के ग्राहकांनी नोंदवले की त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावत आहे. 46 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की देशाचा एकूण आर्थिक दृष्टीकोन सध्या खराब आहे. किरकोळ महागाईमुळे ग्राहकांकडे तेवढी क्रयशक्ती राहिली नाही. याची भरपाई करण्यासाठी शहरी ग्राहक त्यांच्या मोठ्या योजनांना उशीर करत आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवनात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.


खर्चाला कात्री, पण भविष्याबद्दल उत्सुकता 


शहरी लोक खर्चात कपात करत आहेत आणि पैशाची काळजी घेत आहेत, परंतु ते भविष्याबाबतही उत्सुक आहेत. भारतीय ग्राहकांना वाटते की लवकरच परिस्थिती सुधारून महागाई नियंत्रणात येईल. त्यामुळे, वाढत्या किमती जरी डंख मारत असल्या तरी, लोक अजूनही आर्थिक दृष्टिकोनाबद्दल उत्साहित आहेत
.
शहरी भारतीयांना वाटते की सरकार, सामान्य जनता आणि व्यवसायांनी आर्थिक संकटाचा सामना करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ही विचारसरणी जगभरातील ग्राहकांच्या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध आहे.


सुमारे 37 टक्के शहरी भारतीयांनी रशिया-युक्रेन युद्ध ही सध्याची त्यांची सर्वात मोठी चिंता असल्याचे नमूद केले, त्यानंतर 29 टक्के शहरी भारतीयांनी  आर्थिक आव्हाने आहेत. कांटरच्या अहवालानुसार, पर्यावरण आणि हवामानाची चिंताही पहिल्या तीन क्रमांकावर पोहोचली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या