Changes in March : आजपासून नवीन महिना म्हणजे मार्च (March) सुरू झाला आहे. मार्च सुरु होताच, अनेक मोठे बदल दिसून येत आहेत,  ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. दर महिन्याला अनेक बदल पाहायला मिळतात.पण  मार्च महिना विशेष आहे कारण हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे, त्यामुळे प्रत्येकाला पैशाशी संबंधित अनेक कामे पूर्ण करावी लागतात. यावेळी जीएसटी नियमांपासून एलपीजी आणि फास्टॅगमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. 


1 मार्चपासून होणारे मोठे बदल कोणते? 


जीएसटीचे नियम बदलतील


सरकारकडून जीएसटीचे (GST) नियम बदलले जात आहेत. आतापासून 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय करणाऱ्यांना ई-चलानशिवाय ई-वे बिल तयार करता येणार नाही. हा नियम 1 मार्चपासून लागू होणार आहे.


फास्टॅग ई-केवायसी


फास्टॅगचे EKYC अपडेट करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. 1 मार्चपासून तुमचे केवायसी अपडेट न केल्यास, फास्टॅग NHAI द्वारे निष्क्रिय केले जाईल. यासोबतच काळ्या यादीत टाकले जाऊ शकते.


क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल


SBI ने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या किमान दिवसाचे बिल मोजण्याचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम 15 मार्चपासून बदलणार आहेत.


मार्च महिन्यात बँकांना 14 दिवस सुट्टी 


बँकेच्या सुट्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर मार्च महिन्यात शिवरात्री आणि होळीसारखे मोठे सण आहेत. या महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. सुट्ट्यांची यादी प्रदेशानुसार बदलू शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही कामासाठी शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासणे महत्त्वाचे आहे. मात्र, या काळात तुम्ही तुमचे काम नेट बँकिंगद्वारे करू शकता. भारतीय रिझर्व्ह बँक नवीन महिन्याच्या सुरुवातीपूर्वीच बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. आजपासून मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे.  अशा परिस्थितीत आरबीआयने नवीन महिन्यासाठी बँक सुट्टीची यादी जाहीर केली आहे. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करायचे असेल, तर बँकांना सुट्ट्या कधी येतील हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. 


सिलेंडरच्या दरात वाढ


मार्चच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही भाव वाढले होते. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सलग तिसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 25.50 रुपयांनी वाढली आहे. यासह दिल्लीतील किंमत 1795 रुपये झाली.


महत्वाच्या बातम्या:


मार्चमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, 'या' दिवशी बँकांना असणार सुट्टी, संपूर्ण यादी एका क्लिकवर