OPPO F25 Pro 5G : लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च केला आहे. OPPO F25 Pro 5G असं या स्मार्टफोनचं नाव आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने प्रोसेसरसाठी MediaTek Dimensity चिपसेट वापरला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ओशन ब्लू आणि लावा रेड कलरमध्ये लॉन्च केला आहे. सध्या हा स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या संदर्भात आणखी डिटेल्स जाणून घेऊयात.
OPPO F25 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह स्क्रीन आहे. याचा कमाल ब्राइटनेस 1100 nits आहे. यात HDR10+ सपोर्ट आणि पांडा ग्लास प्रोटेक्शन देखील आहे. डिस्प्लेमध्ये सेंट्रेड पंच होल कटआउट देखील दिलेला आहे.
OPPO F25 Pro 5G कॅमेरा कसा असेल?
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो एलईडी फ्लॅश लाईटसह येतो. मुख्य कॅमेरा 64MP OmniVision OV64B सेन्सरसह येतो. या लेन्सचा सेन्सर आकार 1/2 इंच आहे. दुसरा कॅमेरा 8MP Sony IMX355 सेन्सरसह अल्ट्रा-वाईड अँगल लेन्ससह येतो. हे 112 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूला सपोर्ट करते. तिसरा कॅमेरा 2MP मॅक्रो सेन्सर लेन्ससह येतो. फ्रंट कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी, या स्मार्टफोनच्या पुढील भागात 32MP Sony IMX615 सेन्सर आहे.
प्रोसेसर : या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 SoC चिपसेट आहे, जो ग्राफिक्ससाठी Mali G68 GPU सह येतो.
सॉफ्टवेअर : हा स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर आधारित Oppo ऑपरेटिंग सिस्टम ColorOS 14 वर चालतो.
रॅम : या स्मार्टफोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आहे, जी 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येते.
स्टोरेज : या स्मार्टफोनमध्ये 128GB आणि 256GB UFS 3.1 च्या इंटर्नल स्टोरेजसाठी दोन व्हेरिएंट आहेत, जे मायक्रो SD कार्ड स्लॉटसह येतात.
बॅटरी : या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 67W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह येते.
किंमत किती?
या फोनचा पहिला व्हेरिएंट 8GB + 128GB आहे, ज्याची किंमत 23,999 रुपये आहे. या फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB + 256GB आहे, ज्याची किंमत 25,999 रुपये आहे.
विक्री आणि ऑफर
ग्राहकांना जर हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा ओप्पो स्टोअरवरून प्री-ऑर्डर करू शकतात. या स्मार्टफोनची पहिली विक्री 5 मार्च रोजी होणार आहे. कंपनीने या फोनसोबत अनेक लॉन्च ऑफर्सही सादर केल्या आहेत. जर ग्राहकांनी हा स्मार्टफोन HDFC, ICICI किंवा SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे देऊन खरेदी केला तर तुम्हाला 2000 रुपयांची त्वरित सूट दिली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :