Income Tax Return:  देशात सध्या आयकर विवरण दाखल (Income Tax Return) करण्यासाठीची लगबग सुरू आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी  आयकर विवरण दाखल करण्यास आता शेवटचे 12 दिवस शिल्लक आहेत. 31 जुलै 2023 ही शेवटची मुदत आहे. यामुळे शेवटच्या दिवसांची गर्दी टाळण्यासाठी करदात्यांनी मुदत संपण्यापूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र भरावे, असे आयकर विभागाने आवाहन केले आहे. 


प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै 2023 पर्यंत देशात 3 कोटींहून अधिक ITR दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयकर विभागाने हा टप्पा सात दिवस आधी गाठला आहे. ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना प्राप्तिकर विभागाने आनंद व्यक्त केला आहे. 


आयकर खात्याने ट्विटमध्ये काय म्हटले?


आयकर विभागाने ट्विटमध्ये म्हटले की, आम्ही करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभारी आहोत, ज्यांच्या मदतीने आम्ही या वर्षात 7 दिवस आधी 3 कोटी आयकर रिटर्न (ITR) भरले आहेत. मागील तुलनेत. वर्ष, हा आकडा 7 दिवस आधीच गाठला गेला आहे."



"या वर्षी, वर्ष 2023-24 साठी, 18 जुलै 2023 पर्यंत 3 कोटी पेक्षा जास्त आयटीआर दाखल केले गेले आहेत, तर गेल्या वर्षी 25 जुलैपर्यंत तेवढेच आयटीआर दाखल केले गेले होते, असे आयकर विभागाने म्हटले. 






"18 जुलै 2023 पर्यंत दाखल केलेल्या 3.06 कोटी ITR पैकी 2.81 कोटी ITRs ई-व्हेरिफाय झाले आहेत म्हणजे 91 टक्के ITR आतापर्यंत ई-व्हेरिफाय करण्यात आले आहेत. त्यापैकी 1.50 कोटी ITR वर आधीच प्रोसेस करण्यात आली आहे. ज्या लोकांनी अद्याप ITR दाखल केला नाही अशा सर्व लोकांना विनंती आहे की शेवटच्या तारखेची गर्दी टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर ITR दाखल करा, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. 


31 जुलै आहे शेवटची तारीख आहे


यंदा आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. यंदाच्या वर्षी आयकर विवरण भरण्यासाठी मुदत वाढवण्यात येणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आयकर विभागाने करदात्यांना लवकरात लवकर आयकर विवरण दाखल करण्याचे आवाहन केले आहे. 


इतर संबंधित बातमी: