How To Stop Vomiting In Car : कारमधून प्रवास करताना अनेकांना उलट्या (Vomiting) होऊ लागतात. यामुळे संपूर्ण प्रवासाची मजाच बिघडते. गाडीत बसल्यावर उलट्या होणे याला मोशन सिकनेस म्हणतात. ही एक सामान्य समस्या आहे, जी मुले आणि प्रौढ दोघांनाही होऊ शकते. मोशन सिकनेसची अनेक लक्षणे आहेत, जसे की मळमळ, उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी आणि घाम येणे. ही सर्व मोशन सिकनेसची लक्षणे आहेत.मोशन सिकनेस हा काही फार गंभीर आजार नाही, परंतु प्रवासादरम्यान त्यामुळं खूप अस्वस्थ परिस्थिती निर्माण होते.अशा वेळी काही सोपे उपाय केले तर तुम्हाला मोठी मदत होऊ शकते.त्याकरता फाॅलो करा हे काही सोपे उपाय.


- कारमध्ये पुढच्या सीटवर बसा. तुम्हाला त्याठिकाणी आरामदायी वाटेल.


- कारच्या खिडक्या उघड्या ठेवा.यामुळे जास्त ताजी हवा येईल.  तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.


- कारमध्ये मोबाइल पाहणे टाळा. त्याऐवजी,कारच्या खिडक्या उघड्या ठेवून जास्तीत जास्त मोकळी हवा घेण्याचा प्रयत्न करा.


- कारमध्ये उलट्या टाळण्यासाठी औषधे घ्या, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या.


- कारमधून प्रवास करण्यापूर्वी हलके जेवण घ्या. जास्त तेलकट , तिखट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका.


- प्रवासात काळी मिरी आणि लवंग चोखत राहा.


- कारमधून प्रवास करण्यापूर्वी भरपूर पाणी प्या.


- प्रवासापूर्वी दही आणि डाळिंबाचे सेवन केल्याने प्रवासात उलटीच्या समस्येचा त्रास होणार नाही. फक्त दही खाल्ल्याचाही तुम्हाला फायदा होईल.


- सकाळी प्रवास करण्याआधी एका ग्लासात जिरे, धने आणि बडीशेप मिसळून ते संपूर्ण रात्र भिजवून ठेवा.हे प्यायल्यानंतर तुम्हाला प्रवासात उलटीचा त्रास होणार नाही.


- प्रवास करताना तुमच्या सोबत एका डब्यात भात आणि साजूक तुप ठेवावे. उलटी होतेय असे वाटल्यास हे खावे.हे खाल्ल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो.


- केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि फायबर असते. जर आपल्याला उलटी होईल असे वाटत असेल तर आपण तातडीने केळी खायला पाहिजे. त्यामुळे प्रवास करताना कायम तुमच्या सोबत केळी ठेवा.


- आल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. प्रवासादरम्यान आले खाल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो.


- लिंबाच्या (Lemon) औषधी गुणधर्मांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रवास करताना लिंबू सोबत ठेवले पाहिजे. त्रास होत असल्यास एक तर लिंबू चघळा किंवा लिंबू पाणी प्या.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Monsoon Fashion Tips : पावसाळ्यात ट्रेंडी लुक हवा आहे? वापरा 'या' पद्धतीचे कपडे


Car loan Information:

Calculate Car Loan EMI