LIC Income: सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) म्हणजेच LIC साठी आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एलआयसीचा परतावा आयकर विभागानं मंजूर केला आहे. यामुळं एलआयसीला एकूण 25 हजार कोटींहून अधिकचा फायदा होणार आहे. तसेच सध्या एलआयसीला (LIC) 22 हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. 


CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने LIC ला सुमारे 22 हजार कोटी रुपयांचे रिफंड ऑर्डर जारी केले होते. मात्र, परताव्याची एकूण रक्कम 25 हजार कोटींहून अधिक आहे. सध्या, आयकर विभागाकडून 2012-13, 2013-14, 2014-15, 2016-17, 2017-18, 2018-19 आणि 2019-20 मधील मूल्यांकन वर्षांसाठी रिफंड ऑर्डर जारी करण्यात आले आहेत. या ऑर्डर्सची एकूण किंमत 21,740.77 कोटी रुपये आहे. परताव्याची एकूण रक्कम  25,464.46 कोटी रुपये आहे.


एलआयसीचे शेअर्स वधारले (LIC Shares)


गेल्या काही दिवसांत एलआयसीने शेअर (LIC Shares) बाजारातही चांगलीच कमाई केली आहे. गेल्या पाच दिवसांत शेअर्सच्या किंमतीत साडेसात टक्क्यांहून अधिक सुधारणा झाली आहे. गेल्या एका महिन्यानुसार, स्टॉक 17 टक्क्यांहून अधिक नफ्यात आहे. 6 महिन्यांत तो जवळपास 60 टक्क्यांनी वाढला आहे. अलीकडेच, या समभागाने प्रथमच केवळ त्याची IPO पातळी ओलांडली नाही, तर सातत्याने नवीन उच्चांकही बनवला असून तो 1,175 वर गेला आहे.


LIC चा IPO मे 2022 मध्ये आला होता. IPO ची किंमत 902 ते 949 रुपये होती. कंपनीचा IPO काही विशेष नव्हता आणि शेअर्स सवलतीच्या दरात लिस्ट केले गेले. गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढ होण्यापूर्वी, LIC IPO चे गुंतवणूकदार दीर्घकाळ तोट्यात होते.


प्रत्यक्ष कर संकलन वाढलं


जर आपण कर आघाडीवर नजर टाकली तर सीबीडीटीला चांगली बातमी मिळाली आहे. CBDT डेटानुसार, चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कराचे निव्वळ संकलन आतापर्यंत 15.60 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा 20.25 टक्के अधिक आहे. आतापर्यंत 2023-24 या आर्थिक वर्षातील कर संकलनाच्या सुधारित अंदाजापैकी 80.23 टक्के रक्कम सरकारी तिजोरीत पोहोचली आहे. हा आकडा 10 फेब्रुवारीपर्यंतचा आहे. या कालावधीत एकूण प्रत्यक्ष कर संकलन 17 टक्क्यांनी वाढून 18.38 लाख कोटी रुपये झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत एलआयसीने शेअर (LIC Shares) बाजारातही चांगलीच कमाई केलीय. गेल्या पाच दिवसांत शेअर्सच्या किंमतीत साडेसात टक्क्यांहून अधिक सुधारणा झालीय. 


महत्वाच्या बातम्या:


दिलासादायक! LIC ने कमावला 9444 कोटी रुपयांचा नफा, 4 रुपयांचा लाभांश जाहीर; गुंतवणूकदारांना चांगले दिवस