Horoscope Today 16 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2024, शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?  मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...


मकर (Capricorn Horoscope Makar Rashi Today)


आज तुम्ही थोडं सावध राहावं. ऑफिसमधील कामाचा जास्त ताण जाणवला तर आज थोडा ब्रेक घ्या. व्यावसायिकांना आज व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या मित्रांवर विश्वास ठेवा, कोणत्याही छोट्या कारणामुळे तुमची मैत्री तोडण्याचा प्रयत्न करू नका. ही तुमची मोठी चूक असेल. घरातील महत्त्वाच्या वस्तू अतिशय सुरक्षित ठेवा, जेणेकरून गरजेच्या वेळी त्या तुम्हाला त्वरित उपलब्ध होऊ शकतील. जर तुम्ही मादक पदार्थाचं सेवन करत असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे.


कुंभ (Aquarius Horoscope Kumbha Rashi Today)


आज तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही ऑफिसचं काम घरबसल्या ऑनलाईन पूर्ण केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्हाला आराम मिळेल आणि तुमचं ऑफिसचं कामही पूर्ण होईल. व्यावसायिक आज न्यायालयीन प्रकरणात अडकू शकतात, त्यामुळे त्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. तरुणांनी आज त्यांच्या मित्रांशी चांगलं वागलं पाहिजे. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून त्यांची सेवा करा, त्यांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामं पूर्ण होऊ शकतात. आज थंडीमुळे तुमची तब्येत बिघडू शकते.


मीन (Pisces Horoscope Meen Rashi Today)


नोकरी करणाऱ्यांना आज सहकाऱ्यांसोबतचे वाद विसरून पुढे जावं लागेल, सर्व वाद विसरून सहकार्याने काम केलं तरच तुमचं काम लवकर पूर्ण होईल. व्यवसायिकांना व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो, प्रवासापूर्वी व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रं सोबत ठेवण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांनी चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून दूर राहा. तुमचं मन अभ्यासातूनही विचलित होऊ शकते, ज्यामुळे तुमचं करिअर खराब होऊ शकतं. आज कोणत्याही प्रकारच्या कौटुंबिक भांडणापासून दूर राहिलं पाहिजे. आज तुम्हाला सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. घराबाहेर पडताना मास्क अवश्य वापरा, अन्यथा तुमचा आजार वाढू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Guru Gochar 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू करणार वृषभ राशीत प्रवेश; 'या' राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण, धनलाभाचेही योग