एक्स्प्लोर

मोठी बातमी! 2000 रुपयांच्या नोटा बदलून देणं 'या' दिवशी बंद, RBI चा मोठा निर्णय

1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या दिवशी 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा RBI च्या कोणत्याही कार्यालयामध्ये असणार नाही.

2000 Rupee Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय घेतलाय. 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यासंदर्भात किंवा जमा करण्यासंदर्भातील हा निर्णय आहे. 1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या दिवशी 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा RBI च्या कोणत्याही कार्यालयामध्ये असणार नाही.  या दिवशी 2000 रुपयांच्या नोटा जमाही केल्या जाणार नाहीत. कारण नवीन आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सगळे कर्मचारी कामात व्यस्त असणार आहेत.

2 एप्रिलपासून नोटा जमा किंवा बदलण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु होणार

31 मार्चला 2023-24 हे आर्थिक वर्ष संपणार आहे. 1 एप्रिलपासून नवीन 2024-25 हे आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर RBI च्या 19 कार्यालयामध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलून दिल्या जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं ज्या नागरिकांना  2000 रुपयांच्या नोटा जमा करायच्या आहेत, त्यांनी नोटा  2 एप्रिल 2024 पासून जमा कराव्यात.  2 एप्रिलपासून नोटा जमा किंवा बदलण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती RBI ने आपल्या निवेदनात दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 2000 रुपयांच्या 97.62 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. ही आकडेवारी 1 मार्च 2024 ची आहे. 

19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी नोटा जमा करण्यास सुरुवात केली होती. मिळालेल्या माहितीनुसार 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकेकडे जमा झाल्या आहेत. राहिलेल्या नोटा लवकरच जमा होतील. RBI ने नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या कालावधीत नोटा जमा झाल्या नाहीत. त्यामुळं मुदत वाढवण्यात आली होती. ही मुदत पुन्हा 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. त्यानंतर 9 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटा आरबीआयच्या 19 इश्यू कार्यालयात जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अद्यापही ही प्रक्रिया सुरुच आहे. फक्त 1 एप्रिल 2024 या दिवशी नोटा बदलून किंवा जमा केल्या जाणार नाहीत, असा निर्णय आरबीआयने घेतला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Embed widget