एक्स्प्लोर

दिलासादायक! PM किसानचा 16 हप्ता आज जमा होणार, राज्यातील शेतकऱ्यांनी मिळणार 6000 रुपये

आज देशातील शेतकऱ्यंना (Farmers) एक दिलासादायक बातमी मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

PM Kisan Samman Nidhi : आज देशातील शेतकऱ्यंना (Farmers) एक दिलासादायक बातमी मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 6000 रुपये जमा होणार आहेत. कारण, पंतप्रधान किसान सन्मान निधीसह राज्या सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. 

आज पीएम किसान उत्सव दिवस 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून 6000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून 4000 रुपये असे एकुण 6000 रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने  28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज PM किसानचा 16 वा हप्ता जारी करतील. या अंतर्गत सुमारे 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.

15 नोव्हेंबर 2023 ला 15 हप्ता झाला होता जमा

यापूर्वी, 15 नोव्हेंबर 2023 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. 

PM किसान योजनेचा 11 कोटी शेतकऱ्यांना लाभ

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi). गेल्या पाच वर्षापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारनं 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2.81 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. आता पुन्हा 28 फेब्रुवारीला केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 हजार कोटी रुपये जमा करणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

5 वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 2.81 लाख कोटी रुपये, 11 कोटी शेतकऱ्यांना लाभ; 'या' योजनेतून आर्थिक पाठबळ 

 

महत्त्वाच्या बातम्या

पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rates: अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget