एक्स्प्लोर

सन्माननीय चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभय भुतडा फाउंडेशन प्रस्तुत अल्टिमेट पिकलबॉल लीगचे उद्घाटन

महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात अल्टिमेट पिकलबॉल लीग २०२६चे उद्घाटन; देशभरातील १८० हून अधिक खेळाडूंचा सहभाग.

पुण्यात आज ‘अल्टिमेट पिकलबॉल लीग पुणे एडिशन २०२६’चे उद्घाटन झाले. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टॅब ग्लोबल व्हेंचर्स आणि अभय भुतडा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सीए अभय भुतडा उपस्थित होते.

अभय भुतडा फाउंडेशन प्रस्तुत या दोन दिवसीय स्पर्धेमुळे खेळाडू, आयोजक आणि क्रीडाप्रेमी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. पुण्यातील मसलबार स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित या लीगमध्ये देशभरातील १८० हून अधिक खेळाडू १२ संघांमधून सहभागी झाले आहेत. पुरुष आणि महिला एकेरी-दुहेरी तसेच मिश्र दुहेरी प्रकारांमध्ये सामने खेळवले जाणार असून, देशात पिकलबॉल या क्रीडाप्रकाराची वाढती लोकप्रियता यातून अधोरेखित होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

उद्घाटन समारंभात बोलताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, “अल्टिमेट पिकलबॉल लीगसारख्या क्रीडा स्पर्धांमुळे खेळाडू, युवा खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. फिटनेस, समुदाय सहभाग आणि सकारात्मक क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमासाठी आयोजक आणि अभय भुतडा फाउंडेशनचे अभिनंदन करतो. विशेषतः तरुणांमध्ये शिस्त, संघभावना आणि निरोगी जीवनशैली विकसित करण्यासाठी खेळाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा पुढेही क्रीडा आणि सक्रिय जीवनशैलीबाबत अधिक जागरूकता निर्माण करेल, अशी आशा व्यक्त करतो.”

टॅब ग्लोबल व्हेंचर्स आणि अभय भुतडा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सीए अभय भुतडा म्हणाले, “अल्टिमेट पिकलबॉल लीगचे उद्घाटन करून सहभाग आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना पाठबळ दिल्याबद्दल आम्ही चंद्रकांत दादा पाटील यांचे आभारी आहोत. क्रीडा, समुदाय सहभाग आणि युवा सहभागाच्या माध्यमातून सकारात्मक सामाजिक परिणाम घडवणाऱ्या उपक्रमांना पाठबळ देण्याची आमची भूमिका कायम आहे. अल्टिमेट पिकलबॉल लीगसोबत भागीदारी करताना आणि खेळाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणाऱ्या व्यासपीठाला समर्थन देताना आम्हाला आनंद होत आहे. पिकलबॉल हा वेगाने लोकप्रिय होत असलेला आणि सर्व वयोगटांतील लोकांना सहज खेळता येणारा क्रीडाप्रकार आहे. अशा उपक्रमांमुळे अधिकाधिक लोकांना फिटनेस, संघभावना आणि निरोगी स्पर्धेची भावना अनुभवता येईल, अशी अपेक्षा आहे. तसेच नागरिकांनी आणि कुटुंबांनी वीकएंडला येथे येऊन उत्कृष्ट खेळाडूंचे सामने पाहावेत, असे आवाहनही त्यांनी केले.”

अभय भुतडा फाउंडेशनविषयी

२०२३ मध्ये स्थापन करण्यात आलेले अभय भुतडा फाउंडेशन समाजातील वंचित घटकांच्या उन्नती, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. अल्पकालीन मदतीपेक्षा दीर्घकालीन परिणामांवर भर देत, प्रत्येक उपक्रम शाश्वत आणि मोजता येण्याजोगे परिणाम साध्य करण्याच्या दृष्टीने राबवला जातो. सीए अभय भुतडा यांच्या पूर्ण आर्थिक पाठबळातून, कोणतीही बाह्य निधी उभारणी न करता कार्यरत असलेले ही फाउंडेशन शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक जतन या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रमांना समर्थन देते. अल्पावधीतच महाराष्ट्रभरातील लाखो लोकांपर्यंत फाउंडेशनच्या उपक्रमांचा प्रभाव पोहोचला असून, समाजात अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन बदल घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget