Mohit Kamboj: मोहित कंबोज - भारतीय नेता आणि अग्रेसर उद्यमी
रियल इस्टेटमधील अग्रगण्य आणि पायाभूत साचा विकास कंपनी केबीजे ग्रुपचे संस्थापक आणि प्रबंध निर्देशक आहेत. त्यांच्या नवीन विचारसरणी आणि उद्यमशील दृष्टीमुळे व्यापार जगतात तर त्यांना सफलता मिळवून दिली आहेच, पण अनेक समाजोपयोगी प्रयत्नांमुळे त्यांना एक व्यापक ओळखही मिळाली आहे.
सामाजिक कार्य आणि उद्योग या दोघांची सांगड घालून समाजात कार्यरत असणारी फार कमी मंडळी आजकाल पाहायला मिळतात. जी राजकारणातही तेवढीच नावारूपास येत आहेत. यापैकीच एक नाव आहे मोहित कंबोज. आपल्या उत्तम कार्याने समाजमनात आपली जागा आज त्यांनी निर्माण केली आहे. जे आज प्रमुख भारतीय उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजमनात जागा मिळवून आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी समाजात आपल्या उल्लेखनीय योगदानाने चांगलं नावं कमावलं आहे.
रियल इस्टेटमधील अग्रगण्य आणि पायाभूत साचा विकास कंपनी केबीजे ग्रुपचे संस्थापक आणि प्रबंध निर्देशक आहेत. त्यांच्या नवीन विचारसरणी आणि उद्यमशील दृष्टीमुळे व्यापार जगतात तर त्यांना सफलता मिळवून दिली आहेच, पण अनेक समाजोपयोगी प्रयत्नांमुळे त्यांना एक व्यापक ओळखही मिळाली आहे. मग ते समाजातील वंचित घटकांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न असो वा विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण करणं असो. मोहित कंबोज हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून हिरीरीने त्यात सहभाग घेतात. यामागे त्यांच्यामुळे समाजावर पडणारा सकारात्मक प्रभाव आणि अतूट प्रतीबद्धता यामुळे ते मोहित कंबोज लोकांसमोर एक खरी प्रेरणा म्हणून नावारूपास आले आहेत.
नावारूपास येण्याआधीचा काळ
मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय हे नाव आज घराघरात पोचलं आहे. पण त्यांच्या जीवनाचा सुरूवातीचा काळ कसा होता आणि त्यांनी या क्षेत्रात कसा शिरकाव केला याची माहिती बऱ्याच जणांना नसेल. भारतातील हरित क्रांतीचं पंजाब राज्यातील शहर म्हणजे अमृतसर, जिथे मोहित कंबोज यांचा जन्म 30 एप्रिल 1984 साली जन्म झाला. ते एका मजबूत राजकायी पार्श्वभूमी असलेल्या परिवारातील आहेत. कारण त्यांचे आजोबा कृष्ण गोपाल दत्त हे एक स्वातंत्र्य सेनानी आणि संसद सदस्य होते. साहाजिकच घरातील या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा प्रभाव मोहित यांच्यावर बालपणातच झाला आणि राजकीय क्षेत्रापोटी तीव्र उत्सुकता त्यांच्या मनात जागृत झाली. परिणामी राजकीय क्षेत्रात करियर करण्याची प्रेरणा त्यांना आपसूकच मिळाली.
मोहित यांची शैक्षणिक जडणघडण
मोहित यांनी 2002 मध्ये मुंबईत कॉमर्स शाखेतून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात सहभाग घेतला. जो ग्राहकांच्या उत्पादन वितरणाशी संबंधित होता. या दरम्यान त्यांनी व्यापार जगातातील बारकावे शिकून घेतले. मार्केटिंग आणि इंटरप्र्युनरशिपसाठी लागणार बहुमूल्य अनुभवही त्यांनी याच काळात प्राप्त केला.
अग्रेसर उद्योगपती म्हणून नावलौकीक
मोहित यांनी स्वतःचा व्यावसायिक उद्योग केबीजे समूह स्थापन केला. जो तेव्हापासून भारतातील अग्रगण्य रियल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक म्हणून नावारूपास आला आहे. हा समूह आपल्या नवनवीन परियोजनांसाठी ओळखला जातो जो सतत विकासासोबतच शहरी लोकसंख्येचा गरजांही पूर्ण करतो.
फॅमिली मॅन मोहित कंबोज
मोहित कंबोज यांची पत्नी अक्षा कंबोज ही केबीजे समूहाची सदस्य आहे. ज्यांच्या सहयोगातूनच त्यांचे कुटुंब हे लक्ष्य मिळवण्याच्या मार्गावर कार्यरत आहेत.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान
आपल्या व्यावसायिक प्रगतीपथावरील वाटचालीसोबतच मोहित हे राजकारणातही सक्रिय आहेत जे आपल्या समाजाच्या सेवेसाठी सतत तत्पर आणि प्रयत्नशील असतात. 2013 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी (भाजपा) मध्ये प्रवेश केला आणि त्यांना मुंबई यूथ विंगच्या अध्यक्ष रूपात नियुक्त कर ण्यात आलं. तेव्हापासून त्यांनी पक्षाचा विकास आणि यशात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
प्रभावशाली व्यक्तिमत्ववाची यशस्वी वाटचाल
व्यापार आणि राजकीय या दोन्ही क्षेत्रात मोहित कंबोज यांची कामगिरी खूपच प्रभावशाली आहे. त्यांच्या नेतृत्वखाली केबीजे समूहाला रियल एस्टेट विकासातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ज्यामध्ये कंस्ट्रक्शन वीक इंडिया पुरस्कार 2018 मध्ये प्रतिष्ठित इमर्जिंग डेव्हलपर ऑफ द ईयर पुरस्कारही सामील आहे.
एका राजनेत्याच्या रूपातही मोहित हे अनेकदा कौतुकाचे पात्र ठरले आहेत. ज्यामध्ये ग्लोबल युथ मार्केटिंग फोरमद्वारे भारताच्या प्रमुख 100 सर्वात प्रभावशाली युवा नेत्यांच्या रूपात त्यांचं नाव सामील करण्यात आलं होतं. समाजाच्या कल्याण्याप्रती त्यांच्या योगदानासाठी मुंबई पोलीसांद्वारेही त्यांना मान्यता देण्यात आली आहे.
आज मोहित कंबोज हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे जे रियल इस्टेटमधील नवंनवीन परियोजना असोत वा राजकारण, आपल्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी सदैव आपली चुणूक दाखवून दिली आहे. पॉवर हाऊस म्हणून मोहित कंबोज हे नावारूपास आले आहेत. निवडणुकांच्या आधी लोकांची वाहवाई मिळणवणारे निवडणुकानंतर गायब होतात. पण मोहित कंबोज यांच्यासारखा समाजमनात कोरला गेलेला लोकनेता एखादाच असतो. त्यामुळे अशा प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची भविष्यातील गतिशीलता आणि निपुणता पाहण्यास आज समाज उत्सुक आहे. कारण रोजच्या बदलणाऱ्या जगात लोकांनाही लोकनेत्याची तीव्रतेने गरज आहे. जो सामाजिक आणि उद्योग यांची सहजेतेने सांगड घालू शकेल.
संपूर्ण लेख वाचल्यावर तुम्हाला कल्पना येईलच की मोहित कंबोज हे व्यापार आणि राजकारणातील उमदा व्यक्तीमत्त्व असून त्यांचा यशाचा आलेखच सगळं सांगून जातो. मग तो त्यांचा सुरूवातीचा काळ असो वा आत्ताचं प्रभावी नेता म्हणून मिळालेलं लोकपद असो. ते नेहमीच समाजाप्रती प्रतिबंद्ध राहिले असून आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत. अशा या लोकनेत्यास साथ देण्यास आज काय उद्याही जनता नक्कीच उत्सुक असेल यात शंका नाही.