एक्स्प्लोर

चड्ढा रेसिडेन्सी प्रकल्पाचे काम सुरळीत रीत्या पूर्ण करण्यासाठी एमएफओडब्ल्यूए यांच्या भागधारकांमधील समन्वयावर भर

चड्ढा रेसिडेन्सी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सदनिकाधारक, विकासक आणि संबंधित भागधारकांमध्ये समन्वय, पारदर्शकता व विधायक संवादावर एमएफओडब्ल्यूएने भर दिला.

महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशन (एमएफओडब्ल्यूए) द्वारे मंगळवारी आपल्या अंधेरी येथील मुख्यालयात एक पत्रकार परिषद आयोजित केली गेली. यावेळी अंबरनाथमधील कराव शिळ येथे सुरू असलेल्या चड्ढा रेसिडेन्सी प्रकल्पाशी निगडित सदनिकाधारकांच्या पुढील वाटचालीसंबंधी चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यत्वाने येथील सर्व संबंधित घटकांमध्ये विधायक संवाद असणे, प्रकल्पाच्या प्रगतीला गती देणे आणि प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करणे, यावर विशेष भर देण्यात आला.

एमएफओडब्ल्यूएने हे सांगितले, की सदनिकाधारक आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व भागधारक यांच्यात संवाद करण्यासाठी एक सकारात्मक व्यासपीठ निर्माण करणे हा आमच्या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. व्यावहारिक अडचणी दूर करणे आणि संबंधित प्रश्न सोडविण्यास मदत करणे, तसेच प्रकल्पाचे काम सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी सहकार्य करणे, यावर संघटनेचा भर आहे.

संघटने कडून हे नमूद केले गेले, की तिच्याकडे उपलब्ध असलेल्या विक्री करारनाम्यात सदनिकेचा ताबा देण्याची तारीख 31 मार्च 2026 होती. एमएफओडब्ल्यूएने सांगितले, की आता प्रकल्पाच्या कामाची गती कायम ठेवणे, उर्वरित कामे पूर्ण करणे आणि पुढील वाटचालीबाबत आपल्या सदनिकाधारकांच्या मनात अधिक विश्वास निर्माण होईल याबद्दल व्यावहारिक आराखडा निश्चित करणे, याला प्राधान्य दिले पाहिजे.

सकारात्मक समाधानाच्या दिशेने प्रयत्न

संघटनेकडून प्रकल्पाच्या सध्याच्या बांधकाम प्रगतीचा, विविध भागांमध्ये अद्याप पूर्ण करावयाच्या कामांचा आणि प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेल्या पुढील उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेऊन चर्चा करण्याचे आवाहन केले गेले आहे.

एमएफओडब्ल्यूएने सांगितले, की बांधकामाची सध्याची स्थिती, गरजेच्या सोयी आणि प्रकल्पाच्या एकूण विकासाचे वेळापत्रक याबाबत नियमित आणि पारदर्शक माहिती मिळाल्यास सदनिकाधारकांना विशेष लाभ होईल. संघटनेच्या मते, एक प्रभावी आणि सातत्यपूर्ण संवाद केल्याने अनिश्चितता कमी होण्यास मदत होईल आणि कुटुंबांना पुढील निर्णय व नियोजन अधिक आत्मविश्वासाने करता येईल.

पाणीपुरवठा, वीज, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते, लिफ्ट, अग्निसुरक्षा व्यवस्था तसेच सुखकर आणि सुरक्षित राहणीमानासाठी गरजेच्या इतर सोयींसह प्रमुख सोयी व एकूण पायाभूत सोयींची कामे पूर्ण करण्याच्या महत्वावरही संघटनेकडून भर दिला गेला.

पारदर्शकता आणि समन्वयावर भर

एमएफओडब्ल्यूएने व्यावहारिक उपाययोजना निश्चित करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या प्रगतीला सहकार्य करण्यासाठी, प्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञ, गरजेप्रमाणे वित्तीय संस्था तसेच सदनिकाधारकांचे प्रतिनिधी यांच्यासोबतच्या चर्चेत सहभागी होण्याची तयारी व्यक्त केली आहे.

एमएफओडब्ल्यू प्रमाणे, या प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्यापासून ते सदनिकांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेपर्यंतचा प्रवास एक स्पष्ट, वास्तववादी आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण होईल, यासंबंधी एक कार्यप्रकाराचा आराखडा तयार करणे हा यामागील उद्देश आहे.

संघटनेच्या मते, सर्व संबंधित घटकांमध्ये नियमित संवाद राहिल्याने सदनिकाधारकांना बांधकामातील महत्त्वाचे टप्पे, त्यांच्याशी संबंधित आर्थिक बांधिलकी आणि प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कोणती कामे कोणत्या क्रमाने केली जाणार आहेत, हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

सलोखा निर्मिती करुन एक सकारात्मक तोडग्यासाठी निरंतर प्रयत्न

एमएफओडब्ल्यूएने स्पष्ट केले, की प्रकल्पाची प्रगती, उर्वरित कामे, आर्थिक बाबी आणि सदनिकांचा ताबा देण्यासाठी संभाव्य आराखडा याबाबत चर्चा करण्यासाठी संघटनेने यापूर्वी डेव्हलपरला मध्यस्थीच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण व सलोख्याने तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.

यापुढ़े संघटनेने सांगितले, की यासंबंधी संवाद हा विधायक आणि समाधानाच्या दिशेने नेणारा असावा, यासाठी ती सातत्याने प्रयत्नशील आहे. सदनिकाधारकांसाठी महत्वाच्या असलेल्या बाबींवर सर्व संबंधित घटकांमध्ये सातत्याने चर्चा होत राहिल्याने समाधानाचे मुद्दे निश्चित करण्यास आणि प्रकल्पाच्या प्रगतीला गती देण्यास मदत होऊ शकते, असा संघटनेचा विश्वास आहे.

एमएफओडब्ल्यूएने हे सुद्धा नमूद केले, की एवढ्या मोठ्या प्रमाणावरील निवासी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी विविध स्तरांवर समन्वय साधणे गरजेचे असते. सदनिकाधारकांच्या समस्या आणि अपेक्षा एका नियोजित व विधायक चर्चेच्या माध्यमातून मांडून या प्रक्रियेला सहकार्य करणे, हा संघटनेचा उद्देश आहे, असे एमएफओडब्ल्यूएने सांगितले.

एक सामायिक उद्दिष्ट: कुटुंबांसाठी घरे तयार करणे

एमएफओडब्ल्यूएने हे रेखांकित केले, की सदनिकाधारक आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व भागधारक यांचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे, प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन कुटुंबांनी आत्मविश्वासाने आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करणे.

एमएफओडब्ल्यूएने ही आशा व्यक्त केली, की या सुरू असलेल्या संवादातून चड्ढा रेसिडेन्सी प्रकल्पाच्या पुढील वाटचालीबाबत स्पष्ट दिशा निश्चित होईल आणि प्रकल्प पूर्णत्वाच्या अधिक जवळ पोहोचण्यास मदत होईल. तसेच, पात्र सदनिकाधारकांना आपल्या घरासाठी वाट बघण्यात पूर्ण विश्वास असेल आणि उत्तम व सुरक्षित भविष्याची अपेक्षा बाळगता येईल.

एमएफओडब्ल्यूएने एकदा पुन्हा हे रेखांकित केले, की विधायक संवाद आणि समन्वयासाठी त्यांची बांधिलकी तशीच आहे आणि चड्ढा रेसिडेन्सी संबंधित सर्व कुटुंबांच्या हितासाठी सकारात्मक, व्यावहारिक आणि सर्व संबंधितांना मान्य होईल असे समाधान काढण्यासाठी सर्व भागधारकांसोबत सहकार्य करण्यास संघटना सदैव तयार आहे.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget