एक्स्प्लोर

‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ भक्तिमय गीताचे प्रकाशन

‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ या भक्तिमय गीताचे प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते झाले. सौरभ साळुंके यांच्या दमदार आवाजातील हे गीत गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

गणरायाच्या भक्तिभावाला सुरेल संगीताची साथ देणाऱ्या ‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ या भक्तिमय गीताचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्त्या ॲड. रूपालीताई पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

गणपती बाप्पाच्या महिम्याचे आणि भक्तिभावाचे दर्शन घडविणाऱ्या या गीताची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी आणि मधुसूदन गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे. रंगराज पुराणिक यांनी गीताला संगीतबद्ध केले असून, गीताचे शब्द निलेश काटके यांचे आहेत. अभिमन्यू कार्लेकर यांनी संगीत निर्मितीची जबाबदारी सांभाळली असून, सौरभ साळुंके यांनी आपल्या दमदार आणि भावपूर्ण आवाजात हे गीत स्वरबद्ध केले आहे.

‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ भक्तिमय गीताचे प्रकाशन

गायक सौरभ साळुंके हे मराठी संगीत क्षेत्रातील परिचित नाव असून, त्यांनी ‘यादी’, ‘धर्मवीर’ चित्रपटातील गाणी तसेच ‘आनंद हरपला’ यांसारखी अनेक सुप्रसिद्ध गाणी आपल्या आवाजातून रसिकांपर्यंत पोहोचवली आहेत. त्यांच्या दमदार आणि भावस्पर्शी गायकीची छाप या नव्या भक्तिमय गीतातही अनुभवायला मिळणार आहे.

या गीताचे रेकॉर्डिंग Dawn Studios येथे करण्यात आले आहे. गीताच्या निर्मिती प्रक्रियेत अमोल घोडके आणि कुणाल माथा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

गणेशभक्ती, भक्तिरस आणि आधुनिक संगीताचा सुरेल संगम साधणारे ‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ हे गीत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रसिकांच्या भेटीला येणार आहे. भक्तिरसपूर्ण शब्द, मनाला भिडणारे संगीत आणि सौरभ साळुंके यांचा दमदार आवाज यामुळे हे गीत गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.

गणरायाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करणारे हे गीत महाराष्ट्रातील गणेशभक्तांच्या मनात निश्चितच स्थान निर्माण करेल, असा विश्वास गीताच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Embed widget