एक्स्प्लोर

मराठवाडा... कोरडा दुष्काळ ते ओला दुष्काळ

मराठवाड्याच्या मातीला पावसाच्या पाण्याचा स्पर्श होण्याआधी, अशी परिस्थिती होती की ओला दुष्काळ परवडला, पण कोरडा दुष्काळ नको. मात्र आता वरुणराजा असा काही कोसळलाय की ओला दुष्काळही जिवावर बेतू लागला आहे. मराठवाड्याने तब्बल चार वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यावर्षी परतीच्या पावसाने सगळी कमी एकदाच भरुन काढली. नद्या, तलाव आणि धरणांचा घसा ओला झाला आणि तळाला गेलेल्या विहिरी काठोकाठ भरल्यात. मराठवाड्यात या पावसाने नंदनवन फुललंय म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण डोंगराला हिरवा चारा खाणारी जनावरं, नदीवर धुणं धुवायला जाणाऱ्या स्त्रिया हे गेल्या काही वर्षापासून कल्पनेतलंच होतं. पण सगळं पुन्हा पहिल्यासारखं झालंय. dam मराठवाड्यात पाऊस झाल्यानंतर दोन दिवस फेरफटका मारला. यामध्ये असं जाणवलं की निसर्गाने दिलंय तर एवढं का दिलं असावं, की ज्याने सगळं असून नसल्यासारखं झालं आहे. जनावरांच्या चाऱ्यासोबतच पिण्याची पाण्याची सोय झाली आहे, हे सर्वात उत्तमच. मात्र पिकं गेल्याने मागच्या वर्षीची परिस्थिती  यावर्षीही राहते की काय अशी शंका आहे. कारण कर्ज घेऊन खरेदी केलेलं बियाणं, खतं यांचे पैसे कसे फेडणार याचा प्रश्न आहे. पावसाने कोणाच्या घरात पाणी शिरलं तर कुणाची जनावरं वाहून गेली. काहींच्या घरातील कर्ता पुरुष गेला तर कोणाचं छत्र हरपलं. रब्बी हंगामात पिकं येतीलही पण बियाणं खरेदी करण्यासाठी पैसे तर लागणारच आहेत.. शेतकरी हा सर्वात स्वाभिमानाने जगणारा वर्ग.. पण निसर्गाच्या कचाट्यातून सुटणं हे त्याच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. vihir शेतांना पाहिजे त्यापेक्षा किती तरी पटीने जास्तीचा पाऊस होता. त्यामुळे ज्या शेतांची पाणी सोसण्याची क्षमता कमी आहे, त्या शेतातील पिकांची पुरती वाट लागली. यादरम्यानची चांगली गोष्ट म्हणजे पावसाने धरणं भरली, त्यामुळे शेतकऱ्यांनाही एक समाधान होतं की चला पिक गेलं मात्र पुढच्या पिकासाठी पाणी तरी झालं, जनावरांना हिरवा चारा तरी झाला आणि विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणं यंदा पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करायची गरज नाही. crop माणसाने पिण्याच्या पाण्याची, खाण्याची सोय कशी तरी केलीच पण दुष्काळात सर्वात जास्त वाईट जनावरांची परिस्थिती होती. मिळेल त्या चाऱ्यावर जनावरं जगवावी लागली. कडक वाळलेली वैरण (तीही मिळत नव्हती), गढूळ पाणी हा वनवास जनावरांनी चार वर्षे सोसला. यंदाच्या पावसानंतर डोंगराला जनावरं चरताना पाहून आनंद झाला. शेतात पीक नसल्यानं कित्येक शेतकऱ्यांच्या बाहेर शिकणाऱ्या पोरांना घरुन पैसे न आल्यानं शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं. वाईट वनवास होता हा, पण सध्याची हिरवळ आणि भरलेली तलावं पाहता पिकांना चांगला भाव दिला तर कदाचित यापुढं शेतकऱ्यांना कर्ज काढायची गरजही लागणार नाही. cattles चार वर्षे वनवास सोसलाय, अजून काही महिने लढू आणि जिद्दीने बळीचं राज्य आणू, ही प्रबळ आशेची भावना मनात ठेवून पुन्हा जोमाने कामाला लागलेल्या शेतकऱ्यांची ही जिद्द जगातील सर्वात प्रेरणादायी अनुभव आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das  Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Embed widget