Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात चिमुकल्यासह दोन महिलांचा जागीच मृत्यू 
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
जयकुमार गोरेंना प्रणिती शिंदेंकडून कायदेशीर नोटीस, अब्रूनुकसानीचा दावा; म्हणाल्या, 7 दिवसांत माफी मागा अन्यथा...
पंतप्रधानांच्या आवाहनाला सोलापूर ZP चा प्रतिसाद, अध्यक्ष एसटीने तर उपाध्यक्ष सायकलवर जिल्हा परिषदेत येणार
एक सर्पमित्र अन् दुसरा व्हिडिओ एडिटर; जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी अंत, कारची ट्रकला जोरदार धडक बसली अन् जागीच...
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
युद्धामुळं वितरण व्यवस्था विस्कळीत, पंतप्रधानांनी योग्य वेळेला योग्य आवाहन केलं, नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
सोलापूर जिल्ह्यात दुसरा भोंदूबाबाही गजाआड, भोंदू गुरुमाऊली वीरकरला पाच दिवसाची पोलीस कोठडी 
मुख्यमंत्र्यांनाही मुलगी आहे, त्या घटनेनंतरही पेढे भरवत जल्लोष केला, हे कसं सुचतं? नसरापूर प्रकरणावरून प्रणिती शिंदे संतापल्या
मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे प्रकरणात मोठी अपडेट, नगरसेविका शालन शिंदेचा जामीन अर्ज फेटाळला; कोर्टात नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
सोलापुरात वराह पालनाच्या वादातून युवकाला भर रस्त्यात संपवलं, सर्व आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सोलापूर जिल्ह्यात खळबळ! किरकोळ कारणावरुन वाद पेटला, गेल्या 72 तासात सहा जणांचा अंत  
संपत्तीच्या वाद जीवावर उठला! दीरानेच भावजयसह पुतण्या आणि पुतणीचा काढला काटा, 12 वी चा निकाल पाहण्याआधीच प्रियाचा अंत
धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं, मध्यरात्री 12 वाजता नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
फडणवीस म्हणाले, नाहीतर तुम्हीच माझं नाव बदला; सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्कही सुरू होणार
मनोहर मामा भोसले हा सोलापूरचा अशोक खरातच, डीएडमध्ये नापास होऊन भोंदू  झाला, अनिसच्या अस्मिता बालगावकरांचा हल्लाबोल
भोंदू मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी साथीदारासह कारवाई
जामिनावर सुटलेल्या मनोहर मामाचे हादरवणारे कांड; त्याला फसवलं आणि बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवताना चर्चा ऐकली; नंतर जवळ येऊन मनोहर मामाच्या अघोरी विद्येबद्दल सांगितलं, नंबरही दिला अन्....; फिर्यादीने तक्रारीत काय काय सांगितलं?
बाळूमामाचा अवतार सांगून महिलेसोबत नको नको ते केलं, मनोहर मामाचे हादरवणारे कांड; अनेक मोठ्या नेत्यांसोबत फोटो, कोण आहे मनोहर भोसले?
स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगायचा, अखेर भोंदूगिरी उघड, मनोहर मामा भोसलेला अटक; सोलापूरचे SP म्हणाले..
Sponsored Links by Taboola