Women Wear Gold On Feet : सोने (Gold), चांदी (Silver), तांबे, हिरे, मोती अशा विविध प्रकारचे दागिने घालण्याची परंपरा आपल्या भारतात (India) फार पूर्वीपासून आहे. आपल्या घरातही स्त्रियांबरोबर (Women) अनेक पुरुषही दागिने घालतात. पण, विशेषत: पुरुषांपेक्षा महिलांना सोन्या-चांदीची आवड जास्त असते. पण, पायात मात्र कोणीही सोन्याचे दागिने घालत नाही. सोन्याचे दागिने फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत घातले जातात. अगदी श्रीमंत लोकसुद्धा पायात सोन्याचे दागिने घालत नाहीत. यामागे नेमकं काय कारण असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे ज्योतिषशास्त्रात एक मोठं कारण सांगितलं आहे. याचा थेट संबंध शनि, शुक्र, गुरु आणि माता लक्ष्मीशी आहे.
याबाबत ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, शनीचा दोन्ही पायांशी थेट संबंध आहे, त्यामुळे केवळ शनिशी संबंधित धातूच पायात घातले जातात. यामुळे शनि ग्रहण करू शकतो. तसेच, चांदीचे धातू पायात घातल्याने जीवनावर शुभ प्रभाव पडतो. त्यामुळे चुकूनही पायात सोन्याचे अँकलेट, साखळी घालू नये, यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते असं सांगितलं जातं.
चांदीच्या साखळी शुभ का असतात?
याबाबत ज्योतिषी सांगतात की, शनीचा पायांवर अधिकार आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही पायात चांदी घालतात तेव्हा शुक्र ग्रहाला बळ येते. तसेच शुक्र आणि शनि मिळून राजयोग तयार होतो. राजयोग तुमच्या जीवनात आल्याने तुमच्या भौतिक सुखात वाढ होते. पैसा, वैभव, मालमत्ता या गोष्टी आकर्षित होतात. तसेच गरिबी येत नाही. याशिवाय पायात चांदी घातल्याने आपला राग कमी होतो. मनाला शांती मिळते आणि आळसही दूर होतो.
पायात चुकूनही सोन्याची साखळी घालू नका
पायात सोन्याच्या वस्तू न घालण्यामागे एक मुख्य कारण म्हणजे सोनं हा एक बृहस्पति धातू आहे. बृहस्पति हा राजयोगाचा ग्रह आहे. तसेच, सोनं पायात घातल्याने तुमच्या जीवनावर देखील नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच पायात सोनं घालू नये. कारण यामुळे ग्रहाचा अपमान होतो.
याशिवाय सोनं हा देवी लक्ष्मीचा आवडता धातू आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पायात लक्ष्मी धारण करू शकत नाही. कारण तो एक प्रकारे लक्ष्मीचा अपमान मानला जातो. यामुळे आर्थिक नुकसान होते आणि घरात वाद आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :