Reason behind Bell In Temple : भारतात देवदर्शन, पूजा, रिती, परंपरेला फार महत्त्व आहे. यासाठीच प्रत्येक भक्तासाठी हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण जेव्हा देवळात (Temple) दर्शनासाठी जातो तेव्हा मंदिरातील घंटा हे मंदिराचं मुख्य आकर्षण असते. भक्तीपोटी, श्रद्धेपोटी एक आस्था म्हणून आपण ही घंटा वाजवतो आणि दर्शन घेतो. पण, तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का की मंदिरात घंटा का असते? ती का वाजवली जाते? तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
आपल्या भारतात अगदी प्राचीन काळापासून मंदिरात घंटा पाहायला मिळतात. मंदिरात देवाचं दर्शन घेण्याआधी आपण घंटा वाजवतो आणि मग दर्शन घेतो. खरंतर, मंदिरात घंटा वाजवण्यामागे आधात्मिक कारण तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण, यामागे काही वैज्ञानिकही कारणं आहेत. हीच आपण जाणून घेणार आहेत.
मंदिरात घंटा वाजवल्याने मनाला शांती मिळते. देव प्रसन्न होतो. मंदिरात विविध कंपनं निर्माण होऊन एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच, मंदिर हे भक्त आणि देव यांचं मिलन स्थळ आहे. त्यामुळे घंटानादाद्वारे हा आनंद प्रकट करता येतो.
'या' कारणामुळे मंदिरात घंटा वाजवतात...
- कोणत्याही पूजेच्या वेळी सर्वात आधी पूजाविरुद्ध तत्वांना दूर करण्यासाठी मंत्रोच्चार करतात. वामपादेन भूमिं त्रिस्तायेत् असे बोलून आपल्याला तीन वेळा डाव्या पायाने जमिनीला स्पर्श करून ध्वनि निर्माण करतात. त्यामुळे मंदिरात घंटा असतो.
- घंटा वाजवून मंदिरात आपण आपली उपस्थिती दर्शवतो.
- या संदर्भात डॉ. संपूर्णानंद म्हणतात की, घंटा हे नादाचे प्रतीक आहे. जे नाद शब्दाबरोबर सृष्टीचा प्रारंभ झाला होता. आणि त्याच नादाबरोबर अंतसुद्धा होईल हे एक सूचक विधान यामागे आहे.
- याशिवाय घंटेचे मंदिरात स्थान अर्थपूर्ण आहे. जेव्हा मंदिरात घंटा वाजते तेव्हा वातावरणामध्ये ध्वनींचे मोठं वर्तुळ निर्माण होतं. हे वर्तुळ वातावरणाला चार्ज करतात. जितक्या वेळा घंटा वाजतात तेवढ्या वेळा वातावरणामध्ये विद्युतशक्ती निर्माण होत असते. मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त घंटा वाजवून मंदिराच्या वातावरणाला जास्तीत जास्त शक्तिशाली बनवितात.
- मंदिरात प्रवेश करताच आपण जी घंटा वाजवित असतो त्या घंटेचा आवाज आपल्या मेंदूला अचका देत असतो. या अचक्यामुळे बाहेरच्या जीवनातील भौतिक विचारांपासून काही काळ पण दूर राहतो.
- प्रत्येक वेळी घंटानाद केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी-प्रतिध्वनीच्या वर्तुळाचे गुंजन मंदिराच्या वातावरणामध्ये एक विद्युत शक्ती निर्माण करते जी दिसत नाही पण ती अनुभवता येते.
- मंदिरातील घंटा वाजवल्याने अनेक कंपनं निर्माण होतात. त्यामुळे वातावरणातील विषाणू, सूक्ष्मजीव तसेच जीवजंतू नष्ट होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :