मुंबई : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पीएफ अकाऊंट संदर्भातील महत्त्वाचा नियम बदलणार आहे. पीएफ (PF) संदर्भातील मोठा नियम बदलला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) संदर्भातील नियमात बदल केला आहे. पीएफ अकाऊंट ट्रान्सफरकरण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमाअंतर्गत कर्मचाऱ्यांना नवीन सुविधेचा लाभ मिळणार आहे. 


PF संदर्भात 1 एप्रिलपासून नवा नियम लागू


भविष्य निर्वाह निधी (PF)खाते हस्तांतरण करण्याचा नियम बदलला असून याचा कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. 1 एप्रिलपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. पीएफच्या नव्या नियमानुसार, आता तुमचे पीएफ अकाऊंट ऑटो ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच आता नोकरी बदलल्यावर पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची गरज नाही. तुम्ही नोकरी बदलल्यास, तुमचे पीएफ खाते 1 एप्रिलपासून आपोआप ट्रान्सफर होईल.


काय आहे नवा नियम?


आता नोकरी बदलल्यावर कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते आपोआप दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर होईल. याचा अर्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर, पीएफ खात्यात जमा केलेले पैसे हस्तांतरित करण्यासाठी फॉर्म 31 भरण्याची गरज नाही. पीएफ खाते हस्तांतरण करण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे.


अकाऊंट ट्रान्सफर प्रक्रिया आता सोपी


यापूर्वी UAN खाते असूनही कर्मचाऱ्यांना पीएफ ट्रान्सफरसाठी विनंती अर्ज करावा लागत होती. पण आता या त्रासातून कर्मचाऱ्यांची सुटका होणार आहे. पीएफ संदर्भातील नवा नियम 1 एप्रिलपासून लागू झाला आहे. पूर्वी नोकऱ्या बदलताना कर्मचाऱ्यांना UAN मध्ये नवीन PF खाते जोडावे लागत होते. दुसऱ्या नोकरीवर रुजू झाल्यावर, कर्मचाऱ्यांना EPFO ​​वेबसाइटवर जाऊन, त्यांचे EPF खाते विलीन करणे आवश्यक होते. 


पीएफ अकाऊंट आपोआप हस्तांतरित होणार


नोकरी बदलल्यानंतर, तुम्हाला ऑनलाइन EPFO ​​वेबसाइटवर जाऊन तुमचं EPF खातं विलीन करावं लागणार नाही. आता तुम्हाला तुमचे पीएफ खाते मर्ज किंवा ट्रान्सफर करण्याची गरज नाही. नोकरी बदलताच हे आपोआप हस्तांतरित होईल.


भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय?


भविष्य निर्वाह निधी हा कर्मचारी सेवानिवृत्ती निधी आहे. कर्मचाऱ्याला EPF खात्यात मूळ पगाराच्या 12 टक्के हिस्सा द्यावा लागतो आणि समान भाग तुमच्या कंपनीकडून देखील दिला जातो. या खात्याद्वारे कर्मचाऱ्याला नंतर पेन्शन दिली जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये