CAMIT on Maharashtra CM Face : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सुपर एक्सपिरीयन्स नेते आहेत. सध्या महाराष्ट्र वित्तीय संकटासह विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांमुळेही आव्हानात्मक काळातून सामोरे जात आहे. अशा वेळेला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुपर एक्सपिरीयन्स मुख्यमंत्री आवश्यक असल्याचे मत चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड म्हणजेच कॅमिटच्या (CAMIT) अध्यक्षांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस हे सुपर एक्सपिरीयन्स नेते - दीपेन अग्रवाल
मुख्यमंत्रीपदासाठी कॅमिटचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना असल्याची माहिती कॅमिटचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कॅमीट महाराष्ट्रातील 75 लाख पेक्षा जास्त व्यापारी आणि उद्योजकांची एक मोठी संघटना आहे. 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला फक्त राजकीय स्थैर्यच दिलं नव्हतं. तर इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे प्रकल्प ही सुरू केले होते. त्या प्रकल्पांचेच परिणाम आज आपल्यासमोर असल्याचेही अग्रवाल म्हणाले.
सर्वात जास्त क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्या मध्येच
महाराष्ट्राला विकासासह सामाजिक, राजकीय स्थैर्याच्या पथावर ठेवून व्यापार उद्योगाची प्रगती घडवण्याची सर्वात जास्त क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येच आहे. म्हणून आमचा त्यांना पाठिंबा असल्याचे ही कॅमीटचे अध्यक्ष म्हणाले. Chamber of Associations Maharashtra Industrial Trade म्हणजेच CAMIT महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या सर्वात मोठ्या संघटनापैकी एक आहे. ज्यामध्ये 75 लाख व्यापारी आणि उद्योजकांची सदस्य संख्या आहे.
देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री व्हावे ही संघाची इच्छा!
भाजप आणि महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी बसावं, अशी फक्त भाजप कार्यकर्त्यांची इच्छा नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही त्याच भूमिकेत असल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच संघाचा नॅचरल चॉईस असण्याचे अनेक कारण देखील पुढे आले आहेत.
...यावर काम सुरू आहे; मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य
मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. मुंबईत शिंदेंच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली, या बैठकीत तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी मागणी आमदारांनी केली आहे. यावर काम सुरू असल्याचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, तुमच्या चेहऱ्यामुळे महायुतीला फायदा झाला असून तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी केली आहे. तसेच, आता मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीचा तिढा वाढणार असल्याचं बोललं जात आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. महायुती एकसंधच आहे, वितुष्ट येईल अशी वक्तव्य टाळा, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबईत शिवसेना आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. तसेच, आरएसएसच्या कामाचं कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केलं असून आभारही मानले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :