Viral: ते म्हणतात ना.. देवाला प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येकाची काळजी घेणं शक्य नव्हतं. म्हणून त्याने 'आई' घडवली.. आई आपल्या लेकराच्या भल्यासाठी काहीही करू शकते. माणूस असो वा प्राणी, प्रत्येक आई आपल्या मुलावर जगात सर्वात जास्त प्रेम करते. अशात जर मुलाला काही झाले तर त्याचा सर्वाधिक त्रास आईलाच होतो. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. नुकताच भारतीय वन सेवेतील अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही...


व्हिडिओत दिसेल एका आईची व्यथा..!


या व्हिडीओमध्ये एक मादी हत्ती जी एक आई सुद्धा आहे, ती आपल्या मुलाच्या मृत्यूने इतकी दु:खी आहे की तिला ते स्वीकारणे अशक्य आहे. ती आपल्या निर्जीव मुलाला वारंवार ओढताना दिसत आहे. या घटनेचे साक्षीदार असलेल्यांनी सांगितले की ती अनेक दिवस तिच्या मुलासोबत राहिली आणि बाहेर जाण्यास नकार दिला. हे पाहून कुणालाही दुःख होईल. व्हिडिओ शेअर करणारे IFS अधिकारी कासवान यांनी लिहिले की, हत्तीची आई आपल्या मुलाचा मृत्यू समजू शकत नाही. पिल्लाच्या मृत्यूबाबत तिला विश्वास बसत नसल्याने काही काळ ती मृतदेह ओढत राहते.. हे प्राणी देखील आपल्यासारखेच आहेत कासवान पुढे म्हणाले की, हत्तींबाबत अशा प्रकारची भावनिक कृती दिसून आली आहे.






1 लाखांहून अधिक व्ह्यूज


व्हायरल व्हिडीओमध्ये एक हत्तीण आई आपल्या मृत मुलाचा मृतदेह ओढतांना दिसत आहे आणि ती देखील खूप दुःखी दिसत आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडिओ 21 नोव्हेंबर रोजी पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 172000 व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टवर लोकांनी कमेंट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकाने म्हटले, "हे हृदयद्रावक असले तरी, हे देखील एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हत्ती शोक करत बसत नाहीत," तर दुसऱ्या युजरने सांगितले की, हे हृदयद्रावक आहे. देव त्याला शांती देवो.


हत्ती हा सर्वात बुद्धिमान, संवेदनशील आणि कौटुंबिक प्राणी


दुसऱ्या यूजरने सांगितले की, हत्ती हा सर्वात बुद्धिमान, संवेदनशील आणि कौटुंबिक प्राणी मानला जातो. जर त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला, तर संपूर्ण गट तिथे उभा राहतो आणि त्याच्या परत येण्याची/जिवंत होण्याची वाट पाहत असतो आणि जेव्हा त्यांना खात्री पटते की तो परत येणार नाही, तेव्हा ते त्याला सोडून पुढे जातात.


हेही वाचा>>>


Viral: पुण्याच्या FC रोडवर फिरतोय पंजाबी गायक 'दिलजीत दोसांझ'? व्हायरल व्हिडीओचे सत्य काय? नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )