Surya Gochar 2024 : वैदिक पंचांगानुसार, आज म्हणजेच 15 डिसेंबर रोजी सूर्य आपली राशी बदलून धनु राशीत (Sun Transit into Sagittarius) प्रवेश करेल. 2024 सालातील सूर्याचं हे शेवटचं संक्रमण असेल, त्यानंतर खरमास सुरू होईल आणि त्यासोबत शुभ कार्य बंद होतील. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. पण आज आपण अशा राशींबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्यासाठी सूर्याचं हे संक्रमण सुखद ठरेल. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे 3 राशींना मोठा लाभ होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांना त्यांचे अडकलेले पैसे महिनाभरात परत मिळू शकतात. या काळात नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. प्रत्येक कामात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. जर तुम्ही कुठे प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली असेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी आणि लाभ मिळतील. यावेळी तुम्ही घर घेण्याचाही विचार करू शकता. धार्मिक कार्यात रुची वाढेल. पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यवसायात लाभ होईल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. तुमचं आरोग्य चांगलं राहील.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. मुलाचं आरोग्य सुधारेल. कुटुंबियांशी संबंध सुधारतील. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. कुटुंबासोबत धार्मिक सहलीचीही शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामात यश मिळेल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांतूनही तुम्हाला दिलासा मिळू शकेल.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. पैशांअभावी रखडलेली कामं पूर्ण होतील. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. कुटुंबियांशी संबंध सुधारतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल, ज्यामुळे मनःशांती मिळेल. सूर्याच्या मार्गक्रमणामुळे सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. तुम्ही तुमचं काम नव्या उंचीवर नेऊ शकाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. याशिवाय समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Baba Venga : 2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; आर्थिक स्थिती उंचावणार, बाबा वेंगांचं भाकित