Weekly Horoscope 29 July To 04 August Lucky Zodiacs : जुलै महिन्याचा शेवटचा आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 29 जुलैपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. तसेच, मित्राच्या साहाय्याने उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. भौतिक सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. 


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा शुभकारक असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामं वळेत पूर्ण होतील. तसेच, तुम्ही या आठवड्यात फिरायला जाण्याची योजना देखील आखू शकता. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला एखादं नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असल्यास हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांचं देखील अभ्यासात मन रमेल. 


तूळ रास (Libra Weekly Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ ठरेल. तुमच्या करिअरशी संबंधित कोणतीही मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. घरात आनंदाने वेळ घालवाल.


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुमची बदली होऊ शकते. व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला ठरेल. तरुणाईचा हा आठवडा मौजमजेत जाईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबियांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील, परंतु ही संधी तुमच्या हातून निसटू देऊ नका, जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळू शकतं. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू शकतं. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक