Bigg Boss Marathi Season 5  Episode Preview 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला असून शोचा नवा होस्ट रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आपल्या स्टाईलने सगळ्याच स्पर्धकांचे स्वागत केले. आता घरातील 16 सदस्य त्यांच्या स्टाईलने खेळ कसा रंगवणार आणि रितेश भाऊ कसा कल्ला करणार हे प्रेक्षकांना आजपासून पाहायला मिळणार आहे. पण 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळणार आहे. घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. 


'बिग बॉस मराठी'च्या घरात सगळ्याच 16 स्पर्धकांनी एन्ट्री केली आहे. 'बिग बॉस'ने आपल्या घरात सगळ्या स्पर्धकांचे स्वागत केल्यानंतर पहिल्याच दिवशी सगळ्यांना आराम करण्यास सांगितले आणि दुसऱ्या दिवसापासून खेळासाठी सज्ज राहण्याचे सूचक वक्तव्य केले. आता, पहिल्याच दिवशी 'बिग बॉस मराठी'तील स्पर्धकांच्या घरातील सदस्यांचे तोंडचे पाणी पळणार आहे.


'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे. "पाणी सगळं गेलेलं आहे, 'बिग बॉस' पाणी, सगळ्यात आधी आंघोळ करायची असते तर त्याच्यासाठी पाणी नाही, असं म्हणत स्पर्धक 'बिग बॉस'ला पाणी सोडण्यास सांगत आहेत. पाणी अत्यावश्यक बाब असल्याने घरातील सर्व सदस्य हतबल झाले आहेत. पाणी मिळण्यासाठी काकुळतीने 'बिग बॉस'ला ते विनंती करत आहेत. त्यावर बिग बॉस म्हणतात,"आता फक्त घरातलं पाणी गेलंय...थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल" असे सांगतात. त्यामुळे पहिल्याच दिवशी सकाळच्या वेळेसच स्पर्धकांना मोठा धक्का बसला आहे.  






पहिल्या दिवसापासूनच  घरातील सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच बेड, बाथरुम, खाण्यापिण्याच्या सामानासाठी किंमत मोजावी लागणार आहे. आता बिग बॉस सदस्यांना कोणता टास्क देणार, घरात सदस्यांना पाणी मिळावे यासाठी काही अटी, टास्क पूर्ण करावा लागणार का? पाण्यासाठी घरातील सदस्यांना कोणती किंमत मोजावी लागणार हे आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना समजणार आहे. 


'बिग बॉस मराठी'च्या नव्या घराचं दार अखेर उघडलं आहे. पण यंदा चक्रव्यूहामुळे सदस्यांना त्यांच्याप्रमाणे खेळता येणार आहे. सदस्यांचा खेळ पलटवून लावायला आणि त्यांना पेचात अडकवायला 'बिग बॉस' आणि रितेश भाऊ सज्ज आहेत. 


इतर संबंधित बातमी :