Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जुलै महिन्यातील शेवटचा आठवडा संपत आला आहे. लवकरच नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
वृषभ राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध (Taurus Love Horoscope)
नवीन आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांची एका खास व्यक्तीबरोबर भेट होईल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नात्यात काहीसे उतार-चढाव पाहायला मिळतील. नातं टिकवून ठेवण्यासाठी संयम गरजेचा आहे. तसेच, आज पार्टनरबरोबर तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. काही लोकांना विवाहा-संबंधित शुभ वार्ता ऐकायला मिळू शकतात.
वृषभ राशीच्या लोकांचे करिअर (Taurus Career Horoscope)
नवीन आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांची प्रोफेशनल लाईफ फार चांगली असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स फार चांगला असेल. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाल ऑफिसमध्ये ओव्हर टाईम करावा लागू शकतो. तसेच, या आठवड्यात यात्रेला देखील जाण्याचा चांगला योग आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यापारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्ही आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली असणार आहात. पण, पैशांसंबंधित व्यवहार करताना जरा जपूनच करा. काही लोकांना प्रॉपर्टीच्या संदर्भातील वादविवादांपासून सुटका मिळेल. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही स्टॉक, ट्रेड आणि नवीन व्यवसायात तुमचे पैसे गुंतवू शकता.
वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. पण, कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून दूर राहा. कामाचा जास्त ताण घेऊ नका. रोज तुमच्या दिवसाची सुरुवात योग किंवा व्यायामाने करा. त्यामुळे तुम्ही हेल्दी आणि फीट राहाल. दिनश्चर्येत बदल करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: