Weekly Horoscope 28 April To 04 May 2025 : एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुमच्या शत्रूवर तुमचा दबदबा कायम असेल. तसेच, सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या नवीन वस्तूची खरेदी कराल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुमची नवीन व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ घेता येईल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटी कोणतीच रिस्क घेऊ नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा यशाचा असणार आहे. या दरम्यान तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. भौतिक सुख-संपत्तीत तुमची वाढ झालेली दिसेल. या आठवड्यात कोणताही निर्णय घेताना भावनिकरित्या घेऊ नका.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या काळात तुम्ही काही नवीन गोष्टी शिकाल. तसेच, तुमचा व्यवसाय चांगला चालेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. या महिन्यात शनीचं राशी परिवर्तन असल्यामुळे शनीदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्याच्या बाबतीत छोट्या -मोठ्या तक्रारी संभवतील. तसेच, या कालावधीत पैशांची गुंतवणूक करु नका. अन्यथा तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. मित्रांचा सहवास चांगला लाभेल. निरोगी जीवनशैलीचे पालन करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :