Weekly Horoscope 22 July To 28 July 2024 : आजपासून जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा तर काही राशींसाठी तोट्याचा असणार आहे. काही राशींना या आठवड्यात अनेक शुभ परिणाम मिळतील. तर, काही राशींना संकटांचा सामना करावा लागणार. एकूणच जुलै महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा धावपळीचा असेल. पण, मागच्या आठवड्याच्या तुलनेने या आठवड्यात तुम्हाला कमी कष्ट घ्यावे लागतील. परिस्थितीत फरासा बदल दिसून येणार नाही. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कमी ताण जाणवेल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. नंतर तुमच्याच तो अंगलट येऊ शकतो. व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायात चांगला लाभ मिळेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात स्वत:वर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. तसेच, इतरांना वचन देण्याआधी आपण त्याचं पालन करु शकू का याचा नक्की विचार करा. या आठवड्यात तुम्ही पैशांचा व्यवहार जपून करा. कारण, तुम्ही उधारी म्हणून दिलेलेल पैसे तुम्हाला परत मिळतीलच याची शक्यता फार कमी आहे. या आठवड्यात तुम्हाला थोडा फार बदलत्या हवामानाचा फटका बसेल. ताप, सर्दी, खोकला यांसारखे साथीचे आजार बळावू शकतात.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्या कुटुंबात चांगले आणि सकारात्मक, ऊर्जेचे वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. या आठवड्यात जवळच्या लोकांच्या गाठीभेटी होतील त्यामुळे तुमचं मन प्रसन्न असेल. तुमच्या आरोग्यावर लक्ष द्या. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली स्थिती पाहायला मिळेल. कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
नवीन आठवडा तुमच्यासाठी भ्रम निर्माण करणारा असू शकतो. यासाठीच या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेताना तुमच्या विश्वासातील व्यक्तीशी आधी संवाद साधा. त्यानंतरच निर्णय घ्या. महिलांबरोबर व्यवहार करताना सावध राहा. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर, मित्र-परिवाराबरोबर फिरायला जाण्याचा बेत देखील आखू शकता. आरोग्यात पूर्वीपेक्षा जास्त चांगली सुधारणा दिसेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार रोमॅंटिक असणार आहे. लग्नाच्या संबंधित तुम्हाला नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक योग जुळू येतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. थंड पदार्थांपासून दूर राहा.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच, या आठवड्यात तुम्हाला चांगली आणि वाईट अशा दोन्ही बातम्या मिळू शकतात. पण, काळजी करण्याची गरज नाही. तसेच, या आठवड्यात तरुणांना अनेक लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. तसेच, आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण जास्त जाणवेल.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात चांगली असेल. या आठवड्यात तुम्ही फिरायला जाण्याचा, मजा मस्ती करण्याचा बेत आखू शकता. तुमचं मन प्रसन्न असेल. आयुष्यातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला समाधान मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांसाठी देखील हा काळ फार अनुकूल असणार आहे. कुटुंबात सुख-शांती टिकून राहील. तब्येतीत थोडी सुधारणा करावी लागेल. नियमित व्यायाम करा आणि पथ्य पाळा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सकारात्मकता दिसेल. तुम्हाला चांगल्या नोकरीचे अनेक प्रस्ताव येतील. फक्त निर्णय घेताना नीट विचार करुन निर्णय घ्या. तुमच्या पर्सनल गोष्टी जवळच्या व्यक्तींशीच शेअर करा. कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल. व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
वैवाहिक जीवनात आनंद आणि रोमान्स असेल. लव्ह लाईफसाठी मात्र नवीन आठवड्याचा काळ थोडा तणावपूर्ण असेल. या काळात तुमचं उत्पन्न खूप चांगलं असेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. या काळात तुमच्या नोकरीत काही अडचणी येऊ शकतात. काम करताना कामात तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात, त्यामुळे विरोधकांचं पारडं जड असेल. व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे. या काळात तुमचं आरोग्यही उत्तम राहील. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा अनुकूल असेल. करिअरसाठी हा काळ चांगला आहे. नोकरीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरीत तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असाल. व्यवसाय करणाऱ्यांचा नवीन लोकांशी संपर्क वाढेल, जे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही धार्मिक प्रवास कराल, जो तुमच्या मनाला आनंद देईल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होईल, पण खर्च देखील जास्त होईल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
येत्या आठवड्यात तुमची तब्येत ठीक राहील, पण पोटाची काळजी घ्या. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल. नवीन आठवड्यात तुम्ही व्यवसायात जोखीम घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. मित्रांच्या सहकार्याने काही नवीन काम करू शकाल. जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. लव्ह लाईफमध्ये थोडे खटके उडतील, पण बाकी खूप रोमान्स आणि प्रेम देखील असेल. उत्पन्नवाढीसाठी हा चांगला काळ आहे. येत्या दिवसांत तुम्ही नोकरी बदलू शकता.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात तुमचे खर्च वाढतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कौटुंबिक जीवनात तणाव वाढेल. समजूतदारपणाचा अभाव संबंध बिघडवू शकतो. लव्ह लाईफसाठी हा चांगला काळ आहे. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. एखादा छोटा धार्मिक प्रवास करू शकता. या काळात तुम्हाला आर्थिक लाभही होईल. फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: