एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष ते मीन राशीसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 21 to 27 November 2022 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांनी या आठवड्यात काही गोष्टी लक्षात ठेवा. साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 21 to 27 November 2022 : नोव्हेंबरच्या चौथ्या (Astrology) आठवड्याची सुरुवात मार्गशिष महिन्यातील कृष्ण पक्ष द्वादशी तिथीने होत आहे. या आठवड्यात 24 नोव्हेंबरला गुरू स्वतःच्या राशीत म्हणजेच मीन राशीत भ्रमण करणार आहे. गुरूच्या या मार्गामुळे बारा राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

मेष
मेष राशीचे लोक या आठवड्याच्या सुरुवातीला वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. तुमच्या जोडीदाराजवळ आपलं मन व्यक्त करा, जेणेकरून तुमच्यातील गोष्टी परस्पर चर्चेतून सोडवता येईल. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती राहील. आठवड्याच्या मध्यात शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. अचानक धनहानी होईल आणि त्यानंतर लाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही लांबचा प्रवास कराल.

वृषभ
वृषभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला नोकरीच्या बाबतीत काही तणावातून जातील, परंतु तुम्ही कठोर परिश्रम करणार आहात. खर्च वाढल्याने मन अस्वस्थ होईल. आठवड्याच्या मध्यात जीवन साथीदारासोबत चांगला वेळ घालवाल, त्यांच्या भविष्याबद्दल चर्चा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन
साप्ताहिक राशीभविष्यानुसार या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या मुलांबद्दल विचार कराल. कुटुंबातील वातावरण चांगले राहिल, ज्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करू शकाल. प्रेमसंबंधामध्ये चढ-उताराची परिस्थिती राहील. एकमेकांना समजून घेतल्याने अडचणी वाढणार नाही. आठवड्याच्या मध्यात कोणत्याही कामात यश मिळू शकते आणि आठवड्याच्या शेवटी जीवनसाथीशी जवळीक वाढेल आणि संबंधही सुधारतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क
कर्क राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक तणावाचे शिकार होतील. कुटुंबात सुरू असलेल्या तणावाचा तुमच्यावर परिणाम होईल आणि त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, परंतु महादेवाच्या कृपेने परिस्थिती स्थिर होईल. आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडाल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल, त्यांचा विकास होईल आणि तुम्हीही आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत नोकरीसाठी चांगला वेळ येईल.

सिंह
साप्ताहिक राशीनुसार सिंह राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांना भेट देताना दिसतील. कुटुंबात परस्पर संवाद अगदी उत्तम होईल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. सप्ताहाच्या मध्यात तुमचे लक्ष भावंडांच्या समस्येकडे असेल. या आठवड्याच मित्रांसोबत वाद होऊ शकतो, मात्र त्यातून काही जुने वाद सुटतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता.

कन्या
कन्या राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला स्वतःकडे जास्त लक्ष देतील. मनात चांगले विचार येतील. एखादा निर्णय घेणे चांगले राहील, जे काम कराल त्यात यश येईल. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात चांगली तेजी येईल. नोकरीत मेहनत केल्यानंतर थोडे यश मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. भावंडांशी संबंध सुधारतील, परंतु त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तूळ
तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात खर्चाचा सामना करावा लागेल, परंतु आठवड्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या दिवसापासून परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. मनात विचित्र विचार येतील. एखाद्या गोष्टीची थोडी चिंता वाटेल, परंतु सगळं ठीक होईल, आठवड्याच्या मध्यापासून वेळ चांगला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आर्थिक यश मिळेल. पैसे मिळतील आणि बँक बॅलन्सही वाढेल. कुटुंबात उत्साह राहील.

वृश्चिक
सप्ताहाच्या सुरुवातीला वृश्चिक राशीचे लोक आपले उत्पन्न वाढवण्यावर भर देताना दिसतील. तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होईल, तुम्ही केलेल्या मेहनतीच्या बदल्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील, तसेच आरोग्य बिघडू शकते, परंतु आठवड्याच्या शेवटी चांगली कामे होतील. तुमचे आरोग्य सुधारेल. वैवाहिक जीवनात सुधारणा होईल आणि एखाद्या कुशल व्यक्तीप्रमाणे आयुष्यात पुढे जाताना दिसाल.

धनु
धनु राशीचे लोक सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कामाच्या ठिकाणी लक्ष देतील. त्यानंतर तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतील. तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करा, दोन्ही क्षेत्रात चांगली प्रगती कराल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये, खर्चात झपाट्याने वाढ होईल, ज्यामुळे तुम्हाला थोडा ताण येऊ शकतो, त्यानंतर तुम्हाला जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही.


मकर 
या आठवड्याच्या सुरुवातीला मकर राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या योजना यशस्वी होतील. एखादे प्रमोशन बरेच दिवस अडकले असेल तर ते होऊ शकते, याउलट जर प्रमोशन देय असेल तर या काळात ती मिळण्याचीही संधी मिळेल. करिअरसाठी वेळ चांगला राहील. आठवड्याच्या मध्यात उलटून बोलणे टाळा

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला भाग्याची कमतरता जाणवेल. एखादे काम पूर्ण व्हावे यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रार्थना कराल, मात्र नशिबाच्या पाठिंब्याने कामे होतील, काही कामे पूर्ण होत असताना ती बिघडू शकतात. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य बोलके होईल. तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

मीन
बृहस्पतिच्या कृपेने, मीन राशीचे राशीचे लोकं बुद्धिमत्तेच्या जोरावर नाव कमवतील, तसेच घरगुती कार्यक्रमात खूप हातभार लावतील. आठवड्याच्या सुरुवातीला काही मानसिक आव्हाने असतील, मात्र अनावश्यक प्रवास तुम्हाला त्रास देऊ शकतात, परंतु त्यानंतर वेळ चांगला जाईल. नशीबही तुमच्या सोबत असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Geeta Gyan : या दोन गोष्टी माणसाला दुबळे बनवतात, जाणून घ्या गीतेमधील अनमोल विचार

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget