Weekly Horoscope 20 May to 26 May Lucky Zodiacs : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा ठरेल. या आठवड्यात तुमच्यात आणि तुमच्या मित्रांमध्ये झालेले गैरसमज दूर होतील. व्यवसायात सर्व काही ठीक राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन खरेदी करू शकता. तुमच्या जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील, सुखसोयी आणि चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसा खर्च होईल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांचा हा आठवडा खूप चांगला जाईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेऊ शकता. न्यायालयीन प्रकरणं निकाली काढता येतील. या आठवड्यात तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करू शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. तुमचा कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. जे लोक परदेशात करिअर घडवण्याच्या विचारात आहेत, त्यांची कामं मार्गी लागू शकतात. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा उत्तम आहे.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसाय आणि करिअरशी संबंधित प्रवास करू शकता. तुमच्या जीवनातील समस्या या आठवड्यात संपुष्टात येतील. जर तुम्हाला तुमचं प्रेम एखाद्यासमोर व्यक्त करायचं असेल तर हा आठवडा त्यासाठी अनुकूल आहे. या आठवड्यात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते, जी तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :