Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. भाद्रपद महिना देखील सुरु आहे.  त्यामुळे अनेक राशींसाठी हा महिना खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. वृषभ आणि मेषसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. तर, मिथुन राशीला आर्थिक चणचण भासेल. एकूणच सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी पुढचा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. नोकरी बदली केल्यामुळे तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


नवीन आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. अभ्यासात तुमची रुची वाढेल. तसेच, भावा-बहि‍णींबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्यावर अचानक कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. तसेच, प्रॉपर्टीशी संबंधित तुमचे वाद लवकरच मिटू शकतात. तुमचे खर्च वाढत राहतील. तसेच, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तुमचा व्यापार देखील चांगला चालेल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याचा नवीन आठवडा चांगला जाणार आहे. जर तुम्हाला शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. शैक्षणिक बाबतीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. 


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा खर्चिक असणार आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवर तुमचे जास्त पैसे खर्च होतील. मात्र, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे एक प्रकारे सकारात्मक दृष्टीकोन राहील.या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क असणं फार गरजेचं आहे. 


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही नवनवीन प्रयोग करून स्वत:ला पडताळू शकता. अनेक नवीन धोरणं स्विकारण्यासाछी तयार राहा. तसेच, पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Horoscope Today 14 September 2024 : आज शनिवारचा दिवस कोणत्या राशींसाठी ठरणार भाग्याचा? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य