Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींना पुढच्या 7 दिवसांत सोसावे लागतील कष्ट, हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 15 To 21 December 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 15 To 21 December 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. तसेच, ग्रहांच्या गालचाली. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये काहीसे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. तसेच, अनेक सुखाचे क्षणदेखील येतील. आई-वडिलांचा आदर करा. तसेच, पार्टनरच्या मताचा आदर करा.
करिअर (Career) - या काळात तुमच्या करिअकमध्ये देखील तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. नवीन प्रोजेक्टवर काम करताना सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. मानसिक शांती देखील मिळेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली राहील. तसेच, तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे. त्वचा आणि दातांशी संबंधित तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच त्यावर उपचार करा.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - कर्क राशीच्या लोकांनी आपल्या पार्टनरबरोबर मनमोकळा संवाद साधावा. तसेच, तुमच्या राहणीमानात देखील थोडाफार बदल करावा. जे लोक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना मोठी धक्कादायक बातमी मिळू शकते.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला ना नफा ना तोटा होणार आहे. तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहून काम कराल. तसेच, भविष्याच्या बाबतीत तुम्ही गांभीर्याने विचार कराल.
आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुमच्या आर्थिक स्थितीत बदल पाहायला मिळेल. तुम्हाला बिझनेसमधून दुप्पट लाभ मिळेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. यासाठी पैशांचा जपून वापर करा.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये थोडाफार बदल करावा लागेल. नियमित योगासन आणि व्यायाम तुमच्या मानसिक स्थितीसाठी उत्तम राहील. सकस आहार घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















