Weekly Horoscope 13 To 19 January 2025 : जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर थोडं लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला पैशांची थोडी चणचण जाणवेल. तसेच, थंडीचे दिवस असल्याने सकस आहार घ्या.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार झालेला दिसेल. तसेच, या काळात पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित करावं. तसेच, तुम्हाला धार्मिक यात्रेत सहभागी व्हायचं असल्यास ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडलेले दिसतील.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे.या आठवड्यात तुमच्याकडून अनेकांच्या अपेक्षा असतील. त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तसेच, वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला सर्दी, खोकला, घसादुखीचा त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात. यासाठी जपून पैशांचा वापर करा.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. तसेच, या काळात तुम्हाला धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. तुमचं मन अध्यात्माकडे जास्त असेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून अधिक लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची रखडलेली कामे लवकरच पूर्ण होतील. मानसिक शांततेसाठी तुम्ही नियमित ध्यान, योगासन करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :