Weekly Horoscope 12 To 18 August 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑगस्टचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांवर या आठवड्यात एखादी मोठी जबाबदारी पडू शकते, परंतु आपल्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं स्वतःवर घेऊ नका. तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ नका, निर्णयावर ठाम राहा. तुमच्या धाकट्या भावाबहिणींत वाद होऊ शकतात.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणं टाळावं. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटू शकते. प्रेमसंबंधांसाठीही आठवडा संमिश्र असेल. वैयक्तिक जीवनातही समस्या उद्भवू शकतात.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असू शकतो. व्यवसायिकांना या आठवड्यात मोठा फायदा होऊ शकतो. तुमचा प्रियकर तुमच्या मदतीसाठी पुढे येईल. भाऊ-बहिणी एकत्र गोडीने राहतील. या आठवड्यात तुम्हाला काही विशेष कामासाठी धावपळ करावी लागू शकते.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. ऑफिस आणि घरामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य मिळेल. तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. या आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यस्त असेल, या आठवड्यात तुमच्यावर कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे तुम्ही चिंतेत आणि तणावात राहू शकता. करिअर आणि व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम घेणं टाळा.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. व्यवसायात कोणाच्याही प्रभावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका, मालमत्तेच्या वादात कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही प्रियकराच्या बाबतीत भावूक होऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: