Weekly Horoscope 11 to 17 December 2023 : डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. या आठवड्यात तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेम जीवन कसं असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ साप्ताहिक राशीभविष्य


तूळ राशीसाठी नवीन आठवडा अनुकूल राहील. जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्येही तुम्हाला यश मिळू शकतं. या आठवड्यात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली तुमची कामं या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. गुरुवार आणि शुक्रवार तुमच्यासाठी थोडा चिंताजनक असू शकतो. या दोन दिवसांत तुम्हाला कुठून पैसे मिळत असतील तर मिळणारे पैसेही अडकू शकतात. या दोन दिवसांत कोणतीही योजना करू नका, ती यशस्वी होणार नाही. शनिवार चांगला जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल चिंतेत असाल. घरात साप किंवा विंचू येऊ शकतात, त्यामुळे थोडं सावध राहा. 


वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. तुमच्या कामात अडथळे येतील, पण त्यांचा सामना केला तर यशही मिळेल. मंगळवार ते गुरुवार हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. या आठवड्यात घर, कुटुंब आणि कार्यालयात तुमचं वर्चस्व वाढेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. शुक्रवार आणि शनिवारी तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळतील आणि गुंतवलेल्या पैशात नफाही मिळेल. आठवडाभर नशीब तुमच्या बाजूने राहील. 


धनु साप्ताहिक राशीभविष्य


धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात अतिशय संथ राहील. परंतु संपूर्ण आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून चांगला जाईल. सोमवार आणि मंगळवार खूप चांगले दिवस असतील. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल आणि तुमची प्रलंबित कामंही पूर्ण होतील. या आठवड्यात तुमचा खर्च जास्त असेल आणि समस्याही निर्माण होऊ शकतात. मन शांत ठेवा. तुम्हाला त्रासदायक बातम्या देखील मिळू शकतात, परंतु काळजी करू नका, कारण शेवट आनंदी असेल. जर तुम्हाला तुमच्या घरात दुरुस्तीचं काम वगैरे करायचं असेल तर त्यासाठी जास्त खर्च येईल. तुम्ही नवीन घर वगैरे घेण्याचा विचार करू शकता. 


मकर साप्ताहिक राशीभविष्य


मकर राशीसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असेल. तुम्हाला नवीन यश मिळेल आणि सुखद-आश्चर्यकारक परिणाम मिळतील. या आठवड्यात तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य आणि अचूक असेल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. घराच्या आत आणि बाहेर सर्वत्र यश मिळेल. बुधवार आणि गुरुवारी उत्पन्नात वाढ होईल, यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही आनंद मिळेल. शुक्रवार आणि शनिवार त्रासदायक काळ असू शकतो. तुमच्या कामात अडथळे येतील आणि तुमचे विरोधकही सक्रिय होतील. अनावश्यक खर्चही होऊ शकतो. तुमचे खर्च मर्यादित ठेवा. 


कुंभ साप्ताहिक राशीभविष्य


कुंभ राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या कार्यशैलीने आणि चांगल्या दिसण्याने इतर लोकांना आकर्षित कराल. नवीन कामं मिळण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस खूप चांगले राहतील आणि तुमच्यासाठी अनुकूल असतील. तुम्हाला यश मिळत राहील आणि ज्यांना आर्थिक नुकसान होत आहे, त्यांना या आठवड्यात त्यातून सावरण्याची संधी मिळेल. तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला सर्व बाजूंनी पाठिंबा मिळेल. शुक्रवार आणि शनिवारी तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्ही मित्रांना भेटाल आणि तुमची प्रलंबित कामंही पूर्ण होतील.


मीन साप्ताहिक राशीभविष्य


या आठवड्यात मीन राशीच्या लोकांची कमाई कमी आणि खर्च जास्त असेल. कामात अडथळे येतील आणि आर्थिक समस्याही येतील, त्यामुळे अनावश्यक समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवार चांगला दिवस असेल आणि तुम्हाला यश देईल. सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांना यश मिळेल. आर्थिक पाया मजबूत राहील आणि कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल आणि तुमची कामगिरी तुमच्या समवयस्कांपेक्षा चांगली असेल. शुक्रवार आणि शनिवारी जास्त काम होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या वडिलांचं सहकार्य मिळेल आणि आनंद मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 11 to 17 December 2023 : मेष ते कन्या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या