Weekly Horoscope 11 to 17 December 2023 : डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. या आठवड्यात तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेम जीवन कसं असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष साप्ताहिक राशीभविष्य


मेष राशीवर चंद्राची पूर्ण दृष्टी असल्यामुळे या आठवड्यात धन, ऐश्वर्य, वैभव आणि यश मिळण्याची शक्यता आहे. सर्व बाजूंनी चांगल्या बातम्या मिळतील. बुधवार आणि गुरुवारी तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल, काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावेळी तुमचं नशीबही तुमच्या बाजूने नसेल. या दोन दिवशी लांबचा प्रवास टाळा. या आठवड्यात तुमचा एखाद्यासोबत मोठा वाद होऊ शकतो. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमची आर्थिक परिस्थितीही बिघडू शकते. तुमच्या मौल्यवान वस्तू सर्वांना दाखवू नका, चोरी किंवा हरवण्याची भीती आहे. शुक्रवार आणि शनिवारी वेळ तुमच्या अनुकूल राहील. तुमचे उत्पन्नही वाढेल आणि कामाचा वेगही वाढेल


वृषभ साप्ताहिक राशीभविष्य


वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल असेल. या आठवड्यात तुमचे विरोधक सक्रिय होतील, त्यांच्यापासून दूर राहणं आवश्यक आहे. आर्थिक दृष्टीकोनातून बुधवार आणि गुरुवार तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला चांगली बातमी आणि कामांत यश मिळेल. तुमच्या कामाला गती मिळेल आणि तुम्हाला नवीन संधीही मिळतील. शुक्रवारी काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. विचार न करता कोणालाही पैसे देऊ नका. कामात अडथळेही येऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. शनिवारी तुमच्या कुटुंबात काही कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. 


मिथुन साप्ताहिक राशीभविष्य


मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा आनंददायी बातमी देईल. तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवेल. बुधवार आणि गुरुवारी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या आठवड्यात तुम्हाला जास्त राग येऊ शकतो. या रागामुळे विरोधकांशी वादही होऊ शकतात. कोणताही वाद चांगला नसतो आणि त्यामुळे तो टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या आठवड्यात तुमचे मन कोणत्या ना कोणत्या कारणाने उदास राहील. शुक्रवार आणि शनिवार हा दिवस तुमच्यासाठी मोठ्या यशाचा दिवस असू शकतो. या दोन्ही दिवशी तुमचे उत्पन्न चांगले राहील आणि कामही वेगाने होईल. तुमचे कोणतेही काम चुकले असेल तर ते सुधारेल. प्रिय व्यक्तींसोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल.


कर्क साप्ताहिक राशीभविष्य


कर्क राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात चांगली होईल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त काम करावं लागेल, यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया जाईल. मंगळवार आणि बुधवारी चंद्र तुमच्या राशीत अनुकूल असल्यामुळे तुम्हाला सर्व बाजूंनी यश मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली तुमची कामं या आठवड्यात पूर्ण होतील. तुम्ही नवीन वाहन, कपडे, दागिने इत्यादी खरेदी करू शकता. यामुळे तुमचं मनात आनंदी होईल. तुमचा कोणाशी वाद असेल तर तोही आता संपेल. मित्र आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल. शुक्रवार आणि शनिवार हे दुःखाचे दिवस असतील. तुम्हाला कोणतंही काम करावंसं वाटणार नाही. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावं लागण्याची शक्यता आहे. 


सिंह साप्ताहिक राशीभविष्य


सिंह राशीच्या लोकांना भावंडांकडून सहकार्य मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. मंगळवार आणि बुधवारी तुमच्या उत्पन्नात काही अडथळे येऊ शकतात आणि तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. या आठवड्यात तुमची चिंता वाढेल. नकारात्मक विचार तुमच्या जीवनावर वर्चस्व गाजवू शकतात. गुरुवारपासून तुम्हाला थोडी सुधारणा जाणवेल, परंतु केवळ तुमचे फायदे वाढणार नाहीत, तर त्यासोबत तुमच्या समोरील समस्याही वाढतील. शुक्रवार आणि शनिवारी मुलांकडून आनंद मिळेल. तुमच्या उत्पन्नातही सुधारणा होईल. तुम्ही कुठेतरी सहलीला जाऊ शकता, जिथे तुम्हाला भरपूर मज्जा करता येईल. उत्तम गोष्ट म्हणजे तुमचे विरोधक या आठवड्यात शांत राहतील.


कन्या साप्ताहिक राशीभविष्य


कन्या राशीच्या लोकांना येत्या आठवड्यात स्थायी संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तुमचा प्रवास सुखकर होईल आणि कोर्ट केसमध्ये तुम्हाला विजय मिळेल. तुमचं उत्पन्न सामान्य राहील. बुधवार आणि गुरुवार तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चांगला संवाद ठेवाल. तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकेल. शुक्रवार आणि शनिवारी तुमची स्थिती अधिक चांगली होईल. सुधारणा शक्य आहे, तरीही तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काम करू शकणार नाही आणि यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पालकांचं सहकार्य मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Kuldeepak Rajyog 2023: तब्बल 500 वर्षांनंतर बनतोय कुलदीपक राजयोग; 'या' राशीच्या लोकांना करणार मालामाल