Weekly Horoscope 10 To 16 March 2025 : मार्च महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांची लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. मुलांच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. आठवड्याची सुरुवात तुमची फार पराक्रमी असणार आहे. तुम्ही फार धाडसी निर्णय घ्याल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या आठवड्यात भावनिक होऊन कोणताच निर्णय घेऊ नका.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आरोग्याबरोबर तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. थोडासाही हलगर्जीपणा करु नका. तसेच, तुमचा व्यवसाय अत्यंत सुरळीत चालेल. फक्त तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. कुटुंबातील वातावरण आनंदी पाहायला मिळेल. ज्येष्ठांचा आदर करा.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, छोटे-मोठे अडथळे निर्माण होतील. मात्र, त्यावर तुम्ही मात कराल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे कोणाकडून पैसे मागण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. सरकारी योजनांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. तसेच, भविष्यासाठी देखील पैशांची बचत कराल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादा दिर्घकालीन आजार पुन्हा त्रास देईल. अशा वेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. हलगर्जीपणा करु नका.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, व्यवसायात देखील चांगली प्रगती दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या संधीचं तुम्ही सोनं कराल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. मात्र, तुम्ही डगमगून जाऊ नका. तर, स्वत:वर विश्वास ठेवा. मित्रपरिवारासह यात्रेला जाण्याचा देखील शुभ संयोग जुळून येणार आहे. अशा वेळी धार्मिक वातावरणात तुम्ही छान रमाल. मनातील सर्व वाईट विचार दूर होऊन नवीन विचारांची पालवी फुटेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :