Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले आहेत. कराड, चाटे, घुले टोळीच्या दहशतीबाबत जबाबातून माहिती पुढे आली आहे. हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती गोपनीय जबाबातून हाती लागली आहे. देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात हा जबाब अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा? कूठे? आणि कधी? रचला हे स्पष्ट झाले. तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले त्याच्या टोळीची दहशत कशी आहे. हे देखील या जबाबामधून स्पष्ट झाले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्या पाच गोपनीय साक्षीदारांचे जवाब महत्त्वाचे ठरले-

गोपनीय साक्षीदार क्रमांक 1

तिरंगा हॉटेल वर जेवण करताना.. गोपनीय साक्षीदार सोबत होता. त्यावेळी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामधील संवाद..

विष्णु चाटे - आम्ही कमवायचे आणि तुम्हीही वाटोळे करायचे. स्वतःची इज्जत घालवली व आमची पण घालवली. तुला प्लांट बंद करायला पाठवले होते तो तुम्ही बंद केला नाही. उलट हात हलवत परत आलात. 

सुदर्शन घुले -  आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो तेथे संतोष देशमुख आला त्याने आम्हाला कंपनी बंद करून दिले नाही मासाजोग च्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून दिले..

त्यानंतर विष्णू चाटे-  वाल्मिक अण्णाचां निरोप आहे हे काम बंद केले नाही, खंडणी दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केला तर काय परिणाम होतो.

विष्णू चाटे - वाल्मीक अन्नाच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुख कायमचा धडा शिकवा..

सुदर्शन घुले- आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो..

हा जबाब गोपनीय साक्षीदाराने दिलेला आहे..

दुसरा गोपनीय साक्षीदार..

6 डिसेंबर 2024 रोजी आवाजा कंपनी मध्ये झालेल्या मारहाणीनंतर..संतोष देशमुख यांना मी फोन करून सांगितले होते तुम्ही सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करा नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत.. वाल्मिक काराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात. या अगोदर मलाही वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती खोट्या गुण्यामध्ये अडकवले होते...

तिसरा गोपनीय साक्षीदार

वाल्मिक कराड यांनी जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्याकरिता अनेक टोळ्या तयार केल्या आहे.  याच टोळ्याच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो खंडणी नाही दिली तर कंपनी बंद करतो खंडणीसाठी अडथळा करेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करत दहशत पसरवितो. दहशतीमुळे वाल्मिक कराड यांच्या विरोधात कोणी गुन्हा दाखल करत नाही पोलिस  ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही.. वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झाले हे त्यांच्याच टोळीतील लोक होते..

चौथा गोपनीय साक्षीदार

या गोपनीय साक्षीदाराने बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून विनाकारण अडकविण्यात आले त्यामुळे तब्बल 90 दिवस बीड जिल्हा कारागृहात बंदी म्हणून राहावे लागले. वाल्मिक कराड याची संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत असून. त्याच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्याच्या टोळीतील लोकांनी गंभीर गुन्हे करूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत वाल्मीक करण्याची दहशत असल्यामुळे लोक तक्रार देण्यासाठी ठाण्याला जायची हिंमत करत नाहीत..

पाचवा गोपनीय साक्षीदार

प्रतीक घुले व सुधीर सांगळे हे सुदर्शन घुले यास भाऊ मानत होते त्याला भावा म्हणून बोलायचे तिघांची गावात व परिसरात मोठे दहशत आहे. तिघेही वाल्मिक कराड यांची सांगण्यावर खंडणी गोळा करायचे काम करत.

संबंधित बातमी:

बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात